शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ स्मृतींनी आजही येतात शहारे

By admin | Updated: July 30, 2015 03:16 IST

महापुरात मोवाडचे वैभव वाहून गेले त्या घटनेस उद्या (दि. ३०) २४ वर्षे होत आहे. दोन दशकं उलटून गेली तरी मोवाडचे वैभव प्राप्त होऊ शकले नाही.

मोवाड महापुराला २४ वर्षे : २०४ गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधीअविनाश गजभिये  मोवाड महापुरात मोवाडचे वैभव वाहून गेले त्या घटनेस उद्या (दि. ३०) २४ वर्षे होत आहे. दोन दशकं उलटून गेली तरी मोवाडचे वैभव प्राप्त होऊ शकले नाही. महापुराला दोन तपांचा कालावधी लोटला असला तरी महापुराच्या धक्क्यातून अद्यापही मोवाडवासी सावरलेले नाही. आजही या घटनेची आठवण काढताच तडाखा सहन केलेल्या नागरिकांच्या अंगावर शहारे येतात. मोवाडसाठी ३० जुलै १९९१ हा ‘काळा दिवस’च ठरला. महापुराने २०४ निरपराध लोकांना जलसमाधी मिळाली. ती रात्र सर्वांसाठी वैऱ्याचीच ठरली. मृतदेहांचा सडा दोन ते तीन किमीपर्यंत पसरला होता. यात उरली फक्त काही देवांची मंदिरे. महापुराची बातमी सर्वत्र पसरताच शेकडो हात मदतीसाठी धावले. मोवाडचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन कायद्यातील कलम आणि पोटकलमात हे गाव हरविले आहे. पूरग्रस्तांना २५ हजार रुपये आणि तीन हजार चौरस फूट जागा दिली. मोवाड येथील शेतकऱ्यांकडे पुरापूर्वी जवळपास १ हजार ६५० एकर शेती होती. पुरात ६५० एकर शेती खरडल्या गेली ती आता पडिक आहे. ३५० एकरमध्ये गावाचे पुनर्वसन करण्यात आले. ३५० एकर शेती रेल्वेमार्गात गेली. आता उरल्या शेतीवर गुजराण करावी लागते. महाराष्ट्राच्या आणि नागपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या या गावासाठी वर्धा नदी जीवनदायी अशीच होती. या नदीच्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग होत असल्याने उत्पन्नात भर पडून शेतकरीही सधन झाले होते. येथे मोठी बाजारपेठही होती परंतु, ३० जुलै १९९१ च्या रात्री याच वर्धा नदीने अख्ख्या मोवाडवासीयांचे संसार विस्कळीत केले. त्यामुळे महापुरापूर्वीचे जमीनदार आता शेतमजूर म्हणून काम करीत आहेत.बाहेरगावाहून शेतमजूर येणाऱ्या मोवाडचे चित्र पालटून आता या गावातील नागरिक १५ ते २० किमीपर्यंतच्या पट्ट्यात बाहेरगावी कामाला जातात, हे येथील वास्तव आहे. लोकसंख्या तेव्हा १० हजारांपेक्षा अधिक होती. आता केवळ ८ हजार ५०० आहे. दरवर्षी ३० जुलैला मोवाडवासी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळत असून, जलसमाधी मिळालेल्या २०४ गावकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. यासाठी मोठमोठे नेते येतात आणि आश्वासने देत जखमांवर मीठ चोळण्याचेच काम करून जातात. मोवाडवासीयांवर असलेले कर्ज माफ, तरुणांच्या हाताला काम देण्याची घोषणा करतात. परंतु, या घोषणा क्षणातच हवेत विरतात. परत पुढील वर्षी हेच नेते ‘मागच्या पानावरून पुढे’ असा पाढा वाचतात. काही दिवसांपूर्वी मोवाडवासीयांना थोडा दिलासा मिळाला. यापुढे त्यांना त्यांच्या घरावर कर्ज मिळणे शक्य होणार आहे. किमान त्या आधारे जीवनमान सुधारण्याची अपेक्षा नागरिकांमध्ये आहे.