शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

माेदी सरकार शेतकऱ्यांना फसवित आहे : जावंधिया ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST

नागपूर : महाराष्ट्र राज्य किसान महासभा जिल्हाध्यक्ष, शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी नव्या कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका ...

नागपूर : महाराष्ट्र राज्य किसान महासभा जिल्हाध्यक्ष, शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी नव्या कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. विविध उदाहरणे व आकडेवारी सादर करीत माेदी सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आराेप त्यांनी केला. राष्ट्रीय शिक्षा नीतीविरुद्ध आंदोलन समन्वय समितीच्यावतीने शेती व शिक्षण हक्क परिषदेत ते बाेलत हाेते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, उरुवेला कॉलनी, वर्धा रोड येथे ही परिषद पार पडली. समितीचे राज्य मुख्य समन्वयक अशोक सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत सीपीआय नेते अरुण वनकर, सत्यशोधक शिक्षक सभेचे अध्यक्ष रमेश बीजेकर यांनी मार्गदर्शन केले. सीपीएमचे जिल्हा सचिव अरुण लाटकर यांनी ठराव वाचन केले. कोरोना आजाराचा दुरुपयोग करून संसदेला दुर्लक्षित करून दरबारी भांडवलदारांना नफा मिळवून देण्यासाठी शेतकरीविरोधी, गरीब आणि महिलांविरोधी क्रूर कायदे करून त्यांना संकटात आणले आहे. त्याविरुद्ध दिल्लीला सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ही परिषद सक्रिय पाठिंबा देत असल्याचा ठराव येथे पारीत करण्यात आला.

रमेश बीजेकरांनी, केंद्र सरकारचे शिक्षण धाेरण हे अंधश्रद्धा, जाती व्यवस्थेला खतपाणी घालणारे असल्याचा आराेप करीत, माेदी सरकारने मनुस्मृतीची प्रतिष्ठापना करून मागासवर्गीय, आदिवासी, दलित आणि महिलांच्या दमनाचे षड्‌यंत्र रचल्याचा आराेप केला. अशोक सरस्वती यांनी कृषी कायदे व शिक्षण धाेरणाविराेधात समितीने ३६ जिल्ह्यात आंदोलन उभारणी प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले.

संचालन प्रमिला सोनवणे, प्रास्ताविक प्रा. घन:श्याम धाबर्डे यांनी केले, तर यशवंत वासनिक यांनी आभार मानले.