शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

बळी पडलेल्या व्यक्तींना दिली नुकसान भरपाई

By admin | Updated: January 30, 2016 03:11 IST

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे अर्ज करणाऱ्या बळी पडलेल्या व्यक्तींना राज्य शासनातर्फे नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : शासनाविरुद्धची अवमानना याचिका निकालीनागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे अर्ज करणाऱ्या बळी पडलेल्या व्यक्तींना राज्य शासनातर्फे नुकसानभरपाई देण्यात आली आहे. शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली आहे. परिणामी शासनाविरुद्धची संबंधित अवमानना याचिका निकाली काढण्यात आली आहे.फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३५७-क अनुसार गुन्ह्यांमुळे हानी झालेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सहकार्याने अशा व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसाठी भरपाई योजना लागू केली आहे. ‘महाराष्ट्रात बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसानभरपाई योजना-२०१४ ’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत जीवित हानीसाठी दोन लाख, अ‍ॅसिड हल्ला झाल्यास तीन लाख तर, कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये देण्यात येणार आहे. याशिवाय अंत्यसंस्कारासाठी २००० व वैद्यकीय उपचारासाठी कमाल १५ हजार रुपये खर्च देण्याची तरतूद योजनेत करण्यात आली आहे. एका जनहित याचिकेत न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानुसार शासनाने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला नव्हता. यामुळे दिशा या अशासकीय संस्थेचे सचिव पी. एस. खांडपासोरे यांनी ही अवमानना याचिका दाखल केली होती.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांनी शासनाच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर मुळ तक्रार संपल्याचे निरीक्षण नोंदवून याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तेजस्विनी खाडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)