शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसेवा विधेयक सामान्यांना अधिकार देणारेच

By admin | Updated: November 20, 2014 01:02 IST

सत्ता ही वर्चस्व गाजविण्यासाठी नसते तर सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी असते. मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील भाषणातून आपण प्रधानमंत्री नसून प्रधानसेवक असल्याचे सांगितले.

वसंत देसाई : भाऊराव देवरस मानव संसाधन विकास आणि शोध प्रतिष्ठान नागपूर : सत्ता ही वर्चस्व गाजविण्यासाठी नसते तर सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी असते. मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील भाषणातून आपण प्रधानमंत्री नसून प्रधानसेवक असल्याचे सांगितले. येथूनच लोकसेवेची सांकेतिक सुरुवात झाली. हे सरकार लोकांचे आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील लोकांची कामे योग्य वेळेत झाली पाहिजेत. हा लोकांचा अधिकार आहे. त्यासाठीच लोकसेवा विधेयक तयार करण्यात आले असून हे विधेयक सामान्य माणसांना त्यांचा अधिकार देणारे आहे, असे मत डॉ. वसंत देसाई यांनी बुधवारी व्यक्त केले. भाऊराव देवरस मानव विकास आणि शोध प्रतिष्ठानाच्या वतीने ‘लोकसेवा अधिकार विधेयक आहे तरी काय’ विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. सी. एस. उपाख्य बाळासाहेब कप्तान तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, प्राचार्य योगानंद काळे, नरेंद्र जोशी उपस्थित होते. डॉ. देसाई म्हणाले, राज्यात दहा वर्षांपासून माहितीचा अधिकार आहे, पण त्याचा उपयोग करताना सामान्य माणूस दिसत नाही. जोपर्यंत सामान्य जनता कायद्याचा उपयोग आणि अधिकार उपयोगात आणत नाही तोपर्यंत कायद्याचा अर्थ नाही. यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकसेवेचा कायदा केवळ सार्वजनिक प्राधिकरणापुरता मर्यादित नाही. जपानमध्ये हा कायदा १९४७ साली करण्यात आला. काही देशांमध्ये हा कायदा त्यानंतर करण्यात आला आहे. पण त्या देशातील लोक त्यांच्या अधिकारांसाठी या कायद्याचा उपयोग करतात आणि तशी जागरूकता निर्माण करण्यात हे देश यशस्वी झाले आहेत. त्यामुळे लोकसेवेचा कायदा व्हावाच, पण त्यासोबत जागरूकता निर्माण व्हावी. हा कायदा म्हणजे पुढाऱ्यांना जनतेशी जोडणारा आणि त्यांच्याशी संवाद वाढविण्याची संधी देणारा आहे. अ‍ॅड. कप्तान म्हणाले, आपण सरकारला कर देतो. त्या करातूनच कर्मचाऱ्यांचे वेतन मिळते. त्यांच्याकडून आपले काम करून घेणे हा नागरिकांचा नैसर्गिक अधिकारच आहे. कायदा करावा लागणे, हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. कायदा करण्यापेक्षा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करून त्यांना सेवा द्यायला प्रोत्साहित केले पाहिजे. लोकसेवेसारखा एक कायदा ‘डील अ‍ॅण्ड डिस्चार्ज ड्युटी’ महाराष्ट्रात आधीपासूनच आहे. संचालन शिरीष भगत यांनी केले. विनोद वखरे यांनी गीत सादर केले.(प्रतिनिधी)