शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन शिथिल, मास्क गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST

ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन शिथिल केले. ...

ब्रिजेश तिवारी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन शिथिल केले. त्यातच काेराेना संक्रमणाचा धाेका पूर्णपणे टळला नसला तरी नागरिकांनी मास्कचा वापर करणे व बाजारात अथवा गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे टाळायला सुरुवात केली आहे. नागरिकांचा हा बेजबाबदारपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आराेग्य विभागातील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहेे.

लाॅकडाऊनचा छाेट्या माेठ्या उद्याेगांसाेबतच दुकानदार व सामान्य नागरिकांच्या राेजगारावर प्रतिकूल परिणाम झाला. लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर काेंढाळी (ता. काटाेल) येथे आठवडी बाजार भरायला सुरुवात झाली. त्यातच बाजारपेठेतील संपूर्ण दुकाने उघडायला सुरुवात झाल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी माेठ्या प्रमाणात घराबाहेर पडायला सुरुवात केली.या काळात हाॅटेल, ढाबे, बीअर बार, मंगल कार्यालये नियाेजित वेळेसाठी सुरू करण्यात आले.

या ठिकाणी गर्दी हाेणार असल्याचे अपेक्षित असल्याने त्यासाठी शासनाने नियमावलीही जाहीर केली. शिवाय, या काळात प्रत्येकाने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर व तहसीलदार अजय चरडे यांनी वेळावेळी करीत उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व प्रसंंगी कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला. मात्र, नागरिक व व्यावसायिक याकडे लक्ष द्यायला व उपाययाेजनांचे पालन करायला तयार नसल्याने दिसून येते. ही स्थिती काटाेल शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आहे.

...

१५५ काेराेना रुग्णांचा मृत्यू

काेराेना संक्रमणाचा काटाेल तालुक्यातील ग्रामीण भागाला जबर फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेत ही तीव्रता अधिक हाेती. तालुक्यात एकूण ९,५४५ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले हाेते. यातील १५५ काेराेना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, यातील बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सध्या ८० टक्के नागरिक विना मास्क फिरताना व ९५ टक्के नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करताना दिसून येते.

...

लसीकरणाचा वेग मंदावला

तालुका प्रशासनाने काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने उपाययाेजना करायला सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने काेराेना प्रतिबंधक लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, खंडविकास अधिकारी संजय पाटील, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. शशांक व्यवहारे प्रयत्नरत असून, गावागावात जनजागृती केली जात आहे. दुसरीकडे, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध हाेत नसल्याने लसीकरणाचा वेगही मंदावला आहे.