शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कुत्र्यांच्या नसबंदीला लॉकडाऊनचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 13:16 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कामाला मर्यादा आल्या आहेत. या टाळेबंदीमुळे नागपुरात भटक्या श्वानांच्या नसबंदीचे काम मंदावले आहे.

ठळक मुद्देसंख्या वाढण्याची शक्यताएकच संस्था करते काम

रियाज अहमदलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कामाला मर्यादा आल्या आहेत. या टाळेबंदीमुळे नागपुरात भटक्या श्वानांच्या नसबंदीचे काम मंदावले आहे. मागील कार्यकाळाच्या तुलनेत यावेळी नसबंदीच्या प्रमाणात कमतरता आल्याचे दिसून येत आहे. अशात वातावरणात बदल झाल्याचेही चित्र आहे. त्यात कमी नसबंदीमुळे भटक्या श्वानांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे झालेल्या नोंदीनुसार शहरात भटक्या श्वानांची संख्या ८० हजाराच्या जवळपास आहे.महापालिकेचे पशु आरोग्य अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले सांगितले, शहरातील ५ संस्थांना भटक्या श्वानांच्या नसबंदीचे काम देण्यात येणार होते. मात्र टाळेबंदीमुळे ते शक्य झाले नाही व केवळ एकाच संस्थेला हे कंत्राट देण्यात आले. इतर चार संस्थांचे वर्क ऑर्डर झाले आहेत पण टाळेबंदीनंतरच या संस्थांचे काम सुरू होऊ शकेल. सध्या एकच संस्था काम करीत असल्याने आतापर्यंत केवळ ६ हजार श्वानांची नसबंदी करणे शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नसबंदीचे काम केवळ गोरेवाडा केंद्रात सुरू आहे.श्वान होत आहेत आक्रमक, नागरिकांमध्ये दहशतअवेळी झालेल्या पावसाने हवामानात बदल झाला असून रस्त्यावर श्वानांच्या झुंडी जमा होत आहेत. ते आक्रमक झाले असून येणाऱ्या जाणाºयावर हल्ला करायला धावतात. यामुळे लोकांमध्ये भटक्या श्वानांची दहशत निर्माण झाली आहे. नमूद करण्याची बाब म्हणजे पावसाच्या दिवसात श्वान आक्रमक होण्याची स्थिती दिसून येते आणि वाहन चालकांना हा त्रास सहन करावा लागतो. रामदासपेठ, असीनगर, मानेवाडा रोड, कामठी रोड, उमरेड रोड, रामेश्वरी रोड, सीए रोड, सदर, मानकापुर रोड, गिट्टीखदान रोड आदी ठिकाणी श्वानांच्या झुंडी दिसून येत असून या मार्गावर जाणारे वाटसरू, वाहनचालक याना प्रचंड दहशत सहन करावी लागत आहे. झुंडीने हल्ला करून चावा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन घरी जावे लागते.

 

टॅग्स :dogकुत्रा