शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनी ठरू शकते लोकल रेल्वे

By admin | Updated: May 23, 2016 02:55 IST

उपराजधानीच्या शहर सीमेत वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर शहरालगत असलेल्या लहान शहरांचा देखील पसारा झपाट्याने वाढत आहे.

रेल्वे ट्रॅकचे जाळे वाढतेय : मागणी वाढल्यास होऊ शकतो उपराजधानीत विचार नागपूर : उपराजधानीच्या शहर सीमेत वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर शहरालगत असलेल्या लहान शहरांचा देखील पसारा झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे लाईनचे जाळेही वाढत आहे. भविष्यात नागपूरकरांचा मुंबईच्या धर्तीवर लोकल रेल्वेची सुविधा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेट्रो रेल्वेची सेवा मर्यादित मार्गांवर व मर्यादित अंतरापर्यंतच असणार आहे. अशा परिस्थितीत लोकल रेल्वे नागपूरसाठी कमी खर्चात प्रवास घडविणारी संजीवनी ठरू शकते.मंडल रेल प्रबंधक कार्यालयाने यापूर्वी या आशयाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, रेल्वे ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे या प्रस्तावावर गांभीर्याने विचार झाला नाही. आता मात्र चित्र बदलत आहे. नागपूर- वर्धा दरम्यान तिसरीच नव्हे तर चौथी लाईन उभारण्याचा प्रस्ताव तयार होत आहे. नागपूर- कळमना ही लाईन डबल केली जात आहे. इतवारी येथे देखील दोन लूप लाईन तयार केल्या जातील. नागपूर- छिंदवाडा ब्रॉडगेज लाईनचे काम सुरू आहे. गोधनी येथे दोन कार्ड लाईन आहेत. त्यामुळे अतिरिक्त रेल्वे गाड्या चालविण्याची शक्यता वाढली आहे. सद्यस्थितीत शहराच्या चारही दिशेने २५ किलोमीटर अंतरावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कर्मचारी, व्यापारी, कामगार, विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. सध्यस्थितीत या सर्वांना एसटी बस, खासगी बस, सहा आसनी आॅटो किंवा इतर दुसऱ्या खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागते. रस्ता मार्गे प्रवास करणे महागडे व तुलनेत धोकादायकही असते. जाणकारांच्या मते कन्हान, कामठी, कळमना, इतवारी, नागपूर, अजनी, गोधनी, सावनेर, बुटीबोरी, कळमेश्वर या शहरांना जोडणारी कमी डब्यांची लोकल रेल्वे चालविण्याची नितांत गरज आहे. (प्रतिनिधी)