शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

ऐका जनहो धम्मसंदेश बाबासाहेबांचा..

By admin | Updated: October 9, 2016 02:39 IST

लोकजागृतीसाठीच्या विविध माध्यमामध्ये पथनाट्याची संकल्पना काळानुरुप लोकप्रिय ठरली आहे.

आंबेडकर विचारधारा विभागाचा स्तुत्य उपक्रम : विद्यार्थ्यांच्या २२ चमू सादर करणार पथनाट्यनागपूर : लोकजागृतीसाठीच्या विविध माध्यमामध्ये पथनाट्याची संकल्पना काळानुरुप लोकप्रिय ठरली आहे. योजनांबाबत जनजागृती किंवा कोणतेही विचार थेट जनतेपर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून पथनाट्याचे सादरीकरण केले जाते. हीच संकल्पना पुढे नेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन दीक्षाभूमीवर येणाऱ्या जनतेपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. बाबासाहेबांनी दिलेली धम्मदीक्षा ही पीडित, शोषित समाजाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन करणारी क्रांती ठरली. या क्रांतीची आठवण म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळ्याला देश-विदेशातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर गोळा होत असतात. या अनुयायांना पथनाट्याद्वारे काहीतरी संदेश देण्यासाठी डॉ.आंबेडकर विचारधारा विभाग व काही संघटनांनी २०१२ पासून ही संकल्पना सुरू केली आहे. यामध्ये तरुणांचा सहभाग राहिल्यास हे प्रवर्तन अधिक प्रभावी ठरू शकेल या विचाराने आयोजकांनी यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी, यावर्षी विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयांच्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांच्या २२ चमू सहभागी होणार असल्याचे सांगितले. प्रत्येक चमूसोबत एक प्राध्यापक समन्वयक म्हणून हजर राहणार आहे. यासाठी विविध कॉलेजमध्ये जाऊन सभा घेतल्या व उपक्रमाची माहिती दिली. या विद्यार्थ्यांनी महिनाभरापासून प्रॅक्टिस केली असून ११ आॅक्टोबर रोजी मुख्य सोहळ्याच्या दिवशी ठिकठिकणी या चमू पथनाट्य सादर करणार आहेत. याअंतर्गत त्यांना ‘दीक्षाभूमीवरून धम्मसंदेश’ असे लिहिलेले टी-शर्ट व कॅपचा ड्रेस कोड देण्यात आला आहे. दीक्षाभूमीवर येणारे लोक बाबासाहेबांचे विचार ऐकतात मात्र त्यांचे पालन केल्या जात नाही. त्यासाठी विविध विषय घेऊन पथनाट्याद्वारे लोकांचे प्रबोधन केले जाते. व्यसन ही कोणत्याही समाजाला लागलेली दुष्प्रवृत्ती आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर येताना गुटखा, तंबाखू किंवा इतर व्यसन करू नये किंवा येथून बाहेर पडल्यानंतरही या व्यसनांना तिलांजली द्यावी असा संदेश मागील वर्षी देण्यात आला होता. यावर्षी शांती व करुणा ही पथनाट्याची थीम असल्याचे डॉ. आगलावे यांनी सांगितले. सध्याच्या काळात देशामध्ये जाती धर्मावरून अस्वस्थ वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे दहशतवाद फोफावला आहे. अशावेळी बुद्धाच्या शांती व करुणेची गरज असून हाच संदेश पथनाट्याद्वारे देण्यात येणार असल्याचे डॉ. आगलावे यांनी स्पष्ट केले. पंजाबराव वानखेडे, बानाईचे डॉ. सुनील तलवारे, राजेश हाडके, प्रा. केशव पाटील, प्रा. प्रशांत तांबे आदी या उपक्रमात संयोजकाची भूमिका बजावत आहेत. (प्रतिनिधी)विविध महाविद्यालयांचा सहभागडॉ. आंबेडकर विचारधारा विभागासह तिरपुडे कॉलेज, मॉडर्न कॉलेज, साईनाथ कॉलेज, लोककला महाविद्यालय वर्धा, बीपी नॅशनल कॉलेज, मॉरिस कॉलेज, डॉ. आंबेडकर सोशल वर्क कॉलेज, आॅरेंज सिटी कॉलेज, स्वामी विवेकानंद कॉलेज, सामाजिक विकास केंद्र, वानाडोंगरी होस्टेल, संताजी कॉलेज, मोखाडे कॉलेज, बीवायईएस, संयुक्ता जयंती आदींचे विद्यार्थी पथनाट्यात सहभागी होणार आहेत.