शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
5
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
6
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
7
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
10
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
11
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
12
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
13
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
14
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
15
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
16
नीट हिंदी येत नाही अन् सीतेची भूमिका करणार? साई पल्लवी ट्रोल, 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निर्णय
17
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
18
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
19
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
20
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
Daily Top 2Weekly Top 5

लाईट व रिफ्लेक्टर्सचे नियम वाऱ्यावर

By admin | Updated: January 22, 2015 02:54 IST

कायद्यातील लाईट व रिफ्लेक्टर्ससंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

नागपूर : कायद्यातील लाईट व रिफ्लेक्टर्ससंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका जनहित याचिकेत करण्यात आली आहे. बुधवारी हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन अधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतरही दोषी वाहन मालकांवर नियमित कारवाई करीत नसल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने तीन आठवड्यांत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
विनय कुंटे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. त्यांनी २०१० मध्ये ही जनहित याचिका दाखल केली आहे. वाहनांवर रिफ्लेक्टर्स लावण्याचे नवीन निकष तयार करण्यात यावेत, रिफ्लेक्टर्स मोठे, ठळकपणे दिसणारे व स्वयंप्रकाशी असावेत, मोटर वाहन कायदा-१९८८, केंद्रीय मोटर वाहन नियम-१९८९ व महाराष्ट्र मोटर वाहन नियम-१९८९ मधील लाईट व रिफ्लेक्टर्ससंदर्भातील निकष पाळत नसलेल्या वाहन मालकांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि अनफीट वाहनांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी त्यांची विनंती आहे.
२०१० मध्ये वाहतूक पोलीस उपायुक्त व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाईची माहिती सादर केली होती. २८ जानेवारी २०११ रोजीच्या आदेशात न्यायालयाने दोषी वाहन मालकांवर नियमित कारवाई करीत राहण्याची व यासाठी विशेष मोहीम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच, ३ महिन्यांनंतर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, न्यायालयाच्या या आदेशावर योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
मोटर वाहन कायदा-१९८८ मधील ५६ (४) कलमानुसार योग्य प्रकरणांमध्ये फिटनेस प्रमाणपत्र रद्द केले जाऊ शकते. वेगमर्यादा निश्चित केल्यास प्राणघातक अपघातांची संख्या कमी करता येऊ शकते. अपघातानंतरची ६० मिनिटे महत्त्वाची असतात.
या वेळेत योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास अपघातग्रस्ताला वाचविले जाऊ शकते, ही बाबही याचिकाकर्त्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यासंदर्भातही शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.(प्रतिनिधी)