शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुण्याच्या रेल्वेगाड्या अजनीवरून सोडा

By admin | Updated: January 8, 2015 01:21 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्या अजनी रेल्वेस्थानकावरून सोडण्याची मागणी विभागीय रेल्वे उपभोक्ता

सदस्यांची मागणी : विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठकनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्या अजनी रेल्वेस्थानकावरून सोडण्याची मागणी विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी केली.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची १४५ वी बैठक ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले. ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी एप्रिल ते डिसेंबर २०१४ दरम्यान विभागात केलेल्या विकासात्मक कामांची माहिती दिली. बैठकीत सतीश बंग, हर्षवर्धन सिंघवी, दिलीप ठकराल, क्रिष्णा कुमार पांडे, रोहित अग्रवाल, डॉ. अनिल लद्दड, प्रभाकर सुंचुवार, बृजभूषण शुक्ला, शिवचरण मिश्रा, जितेंद्र देसाई, विजय गुल्हाने यांनी विविध सूचना मांडल्या. यात आमला बैतुल पॅसेंजरचा इटारसीपर्यंत विस्तार, बैतुल स्टेशनवर इंडिकेटर बोर्ड लावणे, नागपूर रेल्वेस्थानकावर पूर्वेकडे आणि पश्चिमेकडील भागात अपंगांसाठी पार्किंगची व्यवस्था, प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर प्रसाधनगृहाची व्यवस्था, सेवाग्राम स्थानकावर रँपची व्यवस्था, बल्लारशा ते नागपूरदरम्यान शटल ट्रेन चालविणे, नागपूर ते पुणे दरम्यान दुरांतो एक्स्प्रेस चालविणे आदी मागण्या करण्यात आल्या. बैठकीला वरिष्ठ विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अतुल राणे, अप्पर मुख्य आरोग्य अधीक्षक डॉ. व्ही. के. आसुदानी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता आर. के. द्विवेदी, वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक गौतम जैन, वरिष्ठ विभागीय अभियंता डी. आर. टेंभुर्णे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त इब्राहिम शरीफ, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. एल. कोरी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)