६७ हजाराचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:18+5:302021-06-27T04:07:18+5:30

कन्हान : चाेरट्याने घरफाेडी करीत साेने-चांदीचे दागिने असा एकूण ६७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना ...

Lampas with 67 thousand ornaments | ६७ हजाराचे दागिने लंपास

६७ हजाराचे दागिने लंपास

कन्हान : चाेरट्याने घरफाेडी करीत साेने-चांदीचे दागिने असा एकूण ६७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री बसथांबा परिसरात शुक्रवारी (दि.२५) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

पूजा रवींद्र पाेटभरे (२८, रा. कांद्री बस स्टाॅपजवळ, कन्हान) या गुरुवारी रात्री ८.३० वाजता घराला कुलूप लावून आपल्या आईच्या घरी गेल्या हाेत्या. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील आलमारीमध्ये ठेवलेले साेने-चांदीचे दागिने किंमत ६७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल घेऊन पाेबारा केला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पूजा घरी आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. लगेच त्यांनी पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस हवालदार नरेश वरखडे करीत आहेत.

Web Title: Lampas with 67 thousand ornaments