संतनगरी शेगाव येथे लक्षावधी भक्ताची मांदीयाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 15:23 IST2016-09-06T15:23:45+5:302016-09-06T15:23:45+5:30

विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी संतनगरी शेगाव येथे लक्षावधी भक्ताची मांदीयाळी होती.

Lakhavdhak Bhakta Mandali | संतनगरी शेगाव येथे लक्षावधी भक्ताची मांदीयाळी

संतनगरी शेगाव येथे लक्षावधी भक्ताची मांदीयाळी

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
शेगाव, दि. ६ -  विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी संतनगरी शेगाव येथे लक्षावधी भक्ताची मांदीयाळी होती. पुण्यतिथी उत्सवात महत्व असलेल्या गणेश व वरूण यागात संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी पुर्णाहूती अर्पण केली. त्यानंतर विविध वार्षिक कार्यक्रम संस्थानमध्ये पार पडले. भजनी दिंडी आणि भाविकांच्या अलोट गर्दीमुळे संत नगरीत भक्तीचा मळा फुलला होता.
 
संत गजानन महाराजांच्या संजीवन पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यानंतर पुण्यतिथी उत्सवाला उपस्थित राहणा-या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर्षीच्या पुण्यतिथी महोत्सवाला २ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. यामध्ये दररोज काकडा आरती, भजन, किर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम झाले. यावेळी हभप प्रमोदबुवा पानबुडे, शिवाजीबुवा ठाकरे, हभप रमेशबुवा आवारे, हभप उमेशबुवा दशरथे आणि मंगळवारी सकाळी हभप विष्णुबुवा कव्हळकर यांचे किर्तन झाले. 
 
संत गजानन महाराज मंदीर परिसरात गणेश व वरूण यागाचा पुर्णाहूती सोहळा कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील, नारायण पाटील, रमेशचंद्र डांगरा, चंदुलाल अग्रवाल, गोविंदराव कलोरे, विश्वेश्वर त्रिकाळ, अशोकराव देशमुख, किशोर टांक, पंकज शितुत, नीळकंठदादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. पुर्णाहूतीनंतर आरती आणि महाप्रसाद वितरण झाले. त्यानंतर दुपारी २ वाजता संत गजानन महाराजांच्या रजत मुखवट्यांची राजवैभवी थाटात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ५ वाजता श्रींची पालखी मंदीर परिसरात पोहचली.
 
पुण्यतिथी महोत्सवाला येणा-या दिंडीसाठी बाळापुर रोडवरील आनंदसागर विसावा येथे संस्थानच्यावतीने व्यवस्था करण्यात आली. याठिकाणी पालखी, दिंडीच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. नियमांची पुर्तता करणाºया भजनी दिंडींना ८६ साहित्यांचे वाटप करण्यात आले.
 
दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन
श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक संतनगरीत दाखल झाले. मुंबई, पुणे, कोल्हापुर, सोलापुर, नागपुर तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपºयासह मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड येथील सुमारे दोन लाख भाविकांनी मंगळवारी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. सामाजिक संस्था आणि भक्त मंडळाच्यावतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विविध सेवा देण्यात आल्या.

Web Title: Lakhavdhak Bhakta Mandali