शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

आधी हत्या, नंतर आत्महत्या

By admin | Updated: October 24, 2016 02:56 IST

तरुण व तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगसा गुरुवारी

गुन्हा दाखल : तरुण-तरुणी आत्महत्या प्रकरणकेळवद : तरुण व तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगसा गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, तरुणाने सुरुवातीला तरुणीची हत्या केली आणि नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली, असे तपासात आढळून आल्याने पोलिसांनी मृत तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. विनोद मधुकर गजभिये (२६, रा. मंगसा, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे व मोना दत्तू बोरीकर (२२, रा. केळवद, ता. सावनेर) असे मृत तरुणीचे नाव आहे. मोना ही गुरुवारी मंगसा येथे विनोदच्या घरी आली होती. सायंकाळी विनोदच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलेने विनोदला आवाज दिला. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्या महिलेने परिसरातील नागरिकांना बोलावले. नागरिकांनी आतून बंद असलेले दार तोडले. तेव्हा त्यांना मोना ही पलंगावर पडली असल्याचे तसेच तिच्या गळ्याला ओढणी गुंडाळलेली असल्याचे तसेच विनोद हा छताच्या पंख्याच्या हुकला लटकलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. माहिती मिळताच केळवद पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले व अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली.पोलिसांनी मोनाचा मृतदेह नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मोनाचा मृत्यू ओढणीने गळा आवळल्याने झाल्याचे प्राथमिक उत्तरीय तपासणी अहवालात आढळून आले. त्यामुळे विनोदने आधी मोनाचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि नंतर स्वत: छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली, असेही निदर्शनास आले. परिणामी, केळवद पोलिसांनी मृत विनोद गजभिये याच्याविरोधात भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास सावनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर व ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर भरणे करीत आहेत. (वार्ताहर) दोन वर्षांपासून मैत्रीमोना ही आयटीआय उत्तीर्ण होती. शिवाय, तिचे लग्न जुळले होते. फेब्रुवारी २०१७ मध्ये विवाह मुहूर्त शोधून समारंभ पार पाडण्याचा तिच्या घरच्या मंडळींचा मानस होता. मोना आणि विनोदची मागील दोन वर्षांपूर्वी ओळख झाली आणि तेव्हापासूनच त्यांची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. याच मैत्रीपूर्ण संबंधामुळे ते दोघेही एकमेकांना नेहमीच भेटत असत. याच मैत्रीत तिचा घात झाला.