शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीच्या वादात अपहरण

By admin | Updated: September 3, 2016 01:00 IST

घर रिकामे करण्यासाठी गुन्हेगारांनी एका कुटुंबावर हल्ला करून आई व मुलाचे अपहरण केले.

घर रिकामे करण्यासाठी गुन्हेगारांचा हल्ला : चौघांना अटक नागपूर : घर रिकामे करण्यासाठी गुन्हेगारांनी एका कुटुंबावर हल्ला करून आई व मुलाचे अपहरण केले. ही घटना सीताबर्डी पोलीस ठाणे हद्दीतील भगवाघर ले-आऊट येते घडली. पोलिसांनी चार आरोपीला अटक केली. शिवप्रसाद मुरली बेनकिरवार (२६) रा. पांढरकवडा यवतमाळ, भईमा यादव (२३) पंचशीलनगर, चंद्रपूर, नितीन ठाकूर (२३) त्रिमूर्तीनगर आणि सुरेश चौधरी (२५) पारधीनगर हिंगणा अशी आरोपीची नवे आहेत. ३८ वर्षीय सुलेख रॉय या आपल्या वडिलोपार्जित घरात राहतात. या घरावरून त्यांचा न्यायालयात वाद सुरू आहे. गुरुवारी रात्री आरोपी आपल्या तीन-चार इतर साथीदारांसोबत सुलेख यांच्या घरी आले आणि घर रिकामे करण्यासाठी वाद घालू लागले. घरात तोडफोड केली. आरोपी मारहाण करीत असल्याने रॉय आणि त्यांचे कुटुंबीय घाबरले. आरोपींनी सुलेख व त्यांच्या वृद्ध आईला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि त्यांना यशवंत स्टेडियमजवळ नेऊन सोडले. येथून दोघेही आपल्या नातेवाईकाकडे गेले. तेथून सीताबर्डी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस तातडीने सुलेख यांच्या घरी गेले. तेव्हा चारही आरोपी घरातील सामान फेकताना रंगेहात सापडले. आरोपींनी घरातील सामान फेकून कुटुंबीयांना बाहेर केले होते. पोलीस त्यांना ठाण्यात घेऊन आले. दरोड्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)