शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

कस्तूरचंद पार्क, झिरो माईल विकासाचा कार्यक्रम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST

नागपूर : सिव्हील लाईन्स येथील ग्रेड-१ हेरिटेज कस्तूरचंद पार्क व झिरो माईलच्या विकास आणि संवर्धनाकरिता केल्या जाणाऱ्या कामाचा कालबद्ध ...

नागपूर : सिव्हील लाईन्स येथील ग्रेड-१ हेरिटेज कस्तूरचंद पार्क व झिरो माईलच्या विकास आणि संवर्धनाकरिता केल्या जाणाऱ्या कामाचा कालबद्ध कार्यक्रम सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिकेला दिला. याकरिता महानगरपालिकेला येत्या गुरुवारपर्यंत मुदत देण्यात आली.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, मनपाने कस्तूरचंद पार्कचे ३ तर, झिरो माईलचे ६ टप्प्यांमध्ये विकास आणि संवर्धन केले जाणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच, या दोन्ही हेरिटेजचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टनुसार विकास व संवर्धन करणे, सर्व काम झाल्यानंतर भविष्यात दोन्ही हेरिटेजची देखभाल करणे, हेरिटेजची नियमित साफसफाई करणे, या परिसरात अतिक्रमण होणार नाही याकडे लक्ष देणे इत्यादीसाठी सात सदस्यांचे कार्यदल गठित करण्यात आल्याचे सांगितले. या कार्यदलात हेरिटेज संवर्धन समितीचे सदस्य अशोक मोखा (वास्तूविशारद), पी. एस. पाटणकर (स्ट्रक्चरल इंजिनियर), डॉ. उज्ज्वला चक्रदेव (प्राचार्या, एलएडी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), महानगरपालिकेचे उपायुक्त, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व उपजिल्हाधिकारी (नझुल) यांचा समावेश करण्यात आला आहे. न्यायालयाने ही माहिती रेकॉर्डवर घेतल्यानंतर वरील आदेश दिला. ॲड. श्रीरंग भांडारकर व ॲड. कार्तिक शुकुल यांनी न्यायालय मित्र म्हणून तर, मनपातर्फे ॲड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.