शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

‘कराटे किड’ साक्षी फुलझेले

By admin | Updated: November 28, 2015 03:36 IST

साक्षी संजय फुलझेले या अवघ्या १२ वर्षाच्या चिमुकलीने नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढविला.

मलेशियात घेतली ‘सुवर्ण’ भरारी : रेल्वे स्थानकावर जंगी स्वागतनागपूर : साक्षी संजय फुलझेले या अवघ्या १२ वर्षाच्या चिमुकलीने नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढविला. मलेशियाच्या क्वालालंपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या सातव्या गोजुकाई मलेशिया इंडो कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत मलेशियाच्याच खेळाडूला नमवित सुवर्ण पदकाला गवसणी घातली. काहीच दिवसापूर्वी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी साक्षीच्या आईवडिलांना संघर्ष करावा लागला होता. मात्र परिस्थितीला कीक मारून जिद्द व मेहनतीने नागपूरची ही कराटे कीड सोनेरी यशापर्यंत पोहचली. शुक्रवारी मुंबईवरुन दुरंतो एक्स्प्रेसने नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचली तेव्हा तिचे चाहते व शाळेकडून साक्षीचे जंगी स्वागत करण्यात आले. साक्षीचे यश आश्चर्य वाटावे असेच आहे. दोन महिन्यापूर्वी या स्पर्धेत निवड झाली म्हणून साक्षीच्या घरी पत्र आले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. मात्र दुसऱ्याच क्षणी परिस्थितीची जाणीव होताच तिचा आनंद मावळला. साक्षीचे वडील संजय फुलझेले मिहानमध्ये एका कंपनीत सफाई काम करतात तर आई पुनम घरकाम करते. न्यू कैलासनगर येथे लहानशा खोलीत आईवडील, लहान भाऊ व आजी असे पाच लोकांचे हे कुटुंब राहते. मात्र परिस्थितीपुढे हतबल न होता मुलीला मलेशियाला खेळायला पाठवायचे हा निश्चय संजय यांनी केला. आईने बचत गटातून व काही संस्थांकडून कर्ज घेतले. वडिलांनीही जुळवाजुळव करीत दीड लाख रुपये जमविले आणि साक्षीला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाठविले. साक्षीला करायचे आहे आयएएसया यशात आईवडील, कोच राजेश लारोकर व शाळेचा मोलाचा वाटा असल्याची कृतज्ञता साक्षीने व्यक्त केली. कराटेच्या खेळात नाव कमवायचे आहे. मात्र आयएएस होणे हे माझे पहिले स्वप्न असल्याचे सांगत त्यासाठी कोणतेही कष्ट करायला तयार असल्याचे तिने सांगितले. मलेशियातील यश आणि नागपुरातील स्वागत हा स्वप्नासारखा क्षण असल्याचेही तिने सांगितले.घरी सामान कमी, मेडलच अधिकसाक्षीने वयाच्या पाचव्या वर्षापासून कराटे खेळायला सुरुवात केली. १० व्या वर्षी तिने ब्लॅक बेल्ट मिळविले. तेव्हापासून विविध स्पर्धेत सहभागी होत साक्षीने ४१ सुवर्ण, ६ रजत, ४ कांस्य पदकासह २५च्या वर ट्रॉफी मिळविल्या आहेत. निर्भया बेटी सुरक्षा अभियान समितीच्यावतीने दरवर्षी १६ डिसेंबरला आयोजित प्रशिक्षण शिबिरात १० ते १५ हजार मुलांना साक्षी डेमॉन्स्ट्रेशन देते. याच समितीने १० आॅक्टोबर २०१५ रोजी संस्थेचा पहिला निर्भया बेटी पुरस्कार साक्षीला प्रदान केला. पुढच्या महिन्यात भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे दिल्ली येथे साक्षीचा सत्कार करण्यात येणार आहे. विविध जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांच्या पदकांनी तिचे घर सजविले आहे. घरी सामान कमी आणि पुरस्कारांची संख्याच अधिक आहे. हे पुरस्कार साक्षीच्या मेहनतीची साक्ष देणारेच आहेत.