शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकाच्या स्वच्छतेसाठी तरुणाई सरसावली

By admin | Updated: December 3, 2014 00:37 IST

देशाचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या महाराज बाग चौकातील भव्य स्मारकाची दूरवस्था झाली असल्याची बातमी लोकमतने प्रसारित केली होती.

तीन तास चालले स्वच्छता अभियान : संघटनांचाही पुढाकार
नागपूर : देशाचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या महाराज बाग चौकातील भव्य स्मारकाची दूरवस्था झाली असल्याची बातमी लोकमतने प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजिनियर मित्र परिवाराने स्मारकाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन, स्मारकाचा संपूर्ण परिसर मंगळवारी स्वच्छ केला. तीन तास हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापालिकेनेही बातमीची दखल घेऊन, पाच वर्षापासून दूर्लक्षित असलेल्या स्मारकाला भेट दिली.
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या सुंदर परिसराची महापालिकेच्या दुर्लक्षामुळे वाताहत झाली होती. हा परिसर असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला होता. येथील बाग पूर्णत: नष्ट झाली होती. फुलझाडांऐवजी सर्वत्र गवत उगवले होते. कोरीव काम करण्यात आलेल्या दगांमध्ये झाडे उगवली होती.
बसण्याच्या बाकांच्या जागेवर कचराघर बनले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून याकडे महापालिकेने लक्ष न दिल्याने शहरातील अतिशय सुंदर असलेले हे ठिकाण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. याकडे लोकमतने लक्ष वेधल्यानंतर विविध संघटनांनी स्मारकाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. सर्वांच्या सहकार्याने स्मारक परिसरातली झाडे, गवत, पडलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. महापालिकेच्या सहकार्याने स्मारकाचा परिसर पाण्याने स्वच्छ करण्यात आला. या कार्यात अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजिनिअर मित्र परिवाराचे अध्यक्ष दिलीप मोहितकर, सचिव प्रणय पराते भूषण खडसे, अजय तायवाडे, लक्ष्मीकांत पडोळे, डॉ. सहानपुरे, देवेंद्र मते यांच्यासह आपचे देवेंद्र वानखेडे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)