शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जम्पिंग’वर होणार वादळी चर्चा

By admin | Updated: May 13, 2014 01:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाला हैराण करणार्‍या ‘जम्पिंग’च्या मुद्यावर विद्वत परिषदेच्या मंगळवारी होणार्‍या

नागपूर विद्यापीठ : आज विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची बैठक

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाला हैराण करणार्‍या ‘जम्पिंग’च्या मुद्यावर विद्वत परिषदेच्या मंगळवारी होणार्‍या बैठकीदरम्यान वादळी चर्चा होण्याची चिन्हे आहेत. परिषदेतील सदस्य या मुद्यावर दोन गटांत विभागल्या गेले आहेत. हा मुद्दा व्यवस्थापन परिषदेने विद्वत परिषदेकडे वर्ग केला होता. ‘जम्पिंग’ नाकारल्याच्या मुद्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचे पडसाद राज्याच्या राजकीय पटलावरदेखील उमटल्याने या मुद्याला गंभीरतेने घेण्यात येत आहे. ‘जम्पिंग’च्या अध्यादेशावर व्यवस्थापन परिषदेत फेरविचार तसेच परत चर्चा करण्यात यावी, असे निर्देश राज्यपाल कार्यालयाने दिले होते. त्यानुसार २६ एप्रिल रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली व या बैठकीदरम्यान हा मुद्दा विद्वत परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १३ मे रोजी विद्वत परिषदेची बैठक होणार आहे. यात ‘जम्पिंग’च्या अध्यादेशावर फेरविचार करून सुधारणांसंदर्भात चर्चा होणे अपेक्षित आहे. ‘जम्पिंग’च्या मुद्यावर विद्वत परिषदेचे सदस्यांचे दोन गट तयार झाले आहेत. विरोध करणार्‍या सदस्यांचे मत आहे की जर ‘जम्पिंग’ला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला तर शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होईल.

नागपूर विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांंना

काय आहे मुद्दा?

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जुन्या अभ्यासक्रमातील सातत्याने अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांंनी उन्हाळी २0१४ च्या परीक्षेला बसण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी विद्यापीठात वारंवार आंदोलने झाली . विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने अभियांत्रिकीच्या या विद्यार्थ्यांंना परीक्षेत बसू देण्याचा निर्णय घेतला होता. या अध्यादेशाला व्यवस्थापन परिषदेच्या मंजुरीनंतर राज्यपालांकडे मान्यतेसाठीदेखील पाठविण्यात आले होते. परंतु राज्यपाल कार्यालयाने यावर ताशेरे ओढले. विद्यापीठाने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार या विद्यार्थ्यांंना यंदाची उन्हाळी परीक्षा देता येणार नसल्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. (प्रतिनिधी)