शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जयभीमने दुमदुमली दीक्षाभूमी

By admin | Updated: October 13, 2016 03:52 IST

हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर उतरत होते,

नागपूर : हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर उतरत होते, ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरुप आले होते. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता. जयबुद्ध, जयभीमच्या जयघोषाने अख्खा परिसर दुमदुमून गेला होता.६०व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो मैलावरून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी हजारावर संघटना सरसावल्या होत्या. पाण्यापासून ते भोजनदानाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. सार्वजनिक आरोग्य विभागासह, मेयो, मेडिकल व मनपाच्या आरोग्य विभागाने २४ तास आपली सेवा दिली. गेल्या तीन दिवसांपासून दीक्षाभूमी अनुयायांनी फुलून गेली होती. मात्र कुठेही गडबड, गोंधळ झालेला नाही. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने अनुयायी आले होते. त्यांची शिस्तबध्दता खरोखरच वाखाणण्यासारखी होती. पुस्तकांची दालने ठरली वैशिष्ट्येया सोहळ्याच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर येणारा प्रत्येक जण आयुष्यभर पुरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पुस्तकांची शिदोरी घेऊन जातो. विशेष म्हणजे, केवळ तीन दिवसांत सर्वात जास्त बुद्ध व आंबेडकरी साहित्य विकल्या जाते. यात सर्वात जास्त मागणी असते ती ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाला. या पुस्तकांमधून बाबासाहेबांचे विचार वाचायला मिळतात. त्यांचे विचारच तर आम्हाला बळ देऊन जाते, असे कृतज्ञेचे भाव सर्वांच्याच चेहऱ्यावर असते. या वर्षी विविध पुस्तक प्रकाशन संस्थांनीही आपली दुकाने थाटली होती. परतताना कुणीउपाशी राहू नयेदीक्षाभूमीवरून बुधवारी आपआपल्या घरी परतताना कोणी उपाशीपोटी जाऊ नये म्हणून अनेक संस्थांनी भोजनदानाची व्यवस्था केली होती. मायावती सार्वजनिक उपासक उपासिका या संस्थेने १० हजार लोकांना जेवूघातले. लोखंडे कुटुंबांनीही विशेष व्यवस्था केली होती. माताकचेरी येथील माया मेश्राम यांनी दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ बसून लोकांना भोजन वितरित केले.