शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

'जैश ए मोहम्मद'कडून नागपूरसह दिल्लीतही रेकी, चार हस्तकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 21:21 IST

चार हस्तकांना अटक : रईसच्या नागपूर संपर्कातील अनेकांची चौकशी : 'बंदा' ही टप्प्यात ? नरेश डोंगरे

नागपूर : जैश ए मोहम्मद ने नागपूर सोबतच दिल्लीतही रेकी करून घेतल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. जैश चे हस्तक आणि रईसचे चार साथीदार पुन्हा काश्मीर मध्ये पकडले गेले. त्यांच्याकडून ही माहिती उघड झाल्याचे शिर्षस्थ सूत्रांनी लोकमतला सांगितले आहे. दरम्यान, येथील संघ मुख्यालयासह विविध संवेदनशील स्थळांच्या रेकी प्रकरणात जैश ए मोहम्मदच्या हस्तकाला जो बंदा मदत करणार होता, तो तपास यंत्रणेच्या टप्प्यात असून त्याच्या मुसक्या कोणत्याही क्षणी आवळल्या जाऊ शकतात, अशीही माहिती शिर्षस्थ सूत्रांकडून मिळाली आहे. 

आत्मघाती हल्ल्याच्या इराद्याने जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर याने पाकिस्तानात बसून त्याच्या हस्तकाला नागपुरात पाठविले होते. रईस अहमद असाद उल्ला शेख (२६, अवंतीपुरा, काश्मीर) नामक या हस्तकाकडून उमरने संघ मुख्यालयासह विविध संवेदनशील स्थळाची रेकी करून घेतली. तत्पूर्वी 'नागपुरात पोहोचल्या बरोबर तुला एक 'बंदा' भेटेल आणि तो सगळ्या प्रकारची मदत करेल', असे उमरने रईसला सांगितले होते. 'हा बंदा कोण आहे, नागपूरचा की नागपूरच्या बाहेरचा', ते अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, तपास यंत्रणा त्याचा कसून शोध घेत आहेत. त्यातून 'बंदा' अधोरेखित झाल्याची खास सूत्रांची माहिती आहे. हा बंदा टेक्नोसॅव्ही अन कमालीचा अलर्ट असून त्याच्याकडे अनेक सीम असावे, असाही अंदाज आहे. तो कितीही धूर्त असला तरी त्याचा लवकरच छडा लावला जाईल, असा सूत्रांचा दावा आहे. दरम्यान, जैश ने एकीकडे नागपुरात तर दुसरीकडे दिल्लीतही अनेक संवेदनशील स्थळांची रेकी केली आहे. रईसच्या चौकशीनंतर जैशचे पुन्हा चार हस्तक काश्मीरमध्ये पकडण्यात आले. त्यांच्याकडून हा खळबळजनक खुलासा झाल्याचे खास सूत्रांनी लोकमतला सांगितले आहे. परिणामी तपास यंत्रणा आता आणखीच जास्त सक्रिय झाल्या आहेत.

पन्नासेक जणांची चौकशी 
स्थानिक अधिकाऱ्यांनी श्रीनगरला जाऊन रईसची चौकशी केल्यानंतर स्थानिक पोलिस तसेच एटीएसने आजवर 'रईस' च्या संपर्कात आलेल्या पन्नासेक जणांची चौकशी केली आहे. ज्या हॉटेल मध्ये तो थांबला होता, त्या हॉटेलच्या चालक, मालक, वेटर, कर्मचारी, ज्या मशिदीत गेला होता, जिथून त्याने ताविज घेतला, त्यांनाही विचारपूस करण्यात आली आहे. रईसने ज्या ज्या वाहनांचा नागपुरात वापर केला, ती सर्व वाहने शोधून पोलिसांनी वाहनचालकांनाही प्रदीर्घ विचारपूस केली आहे. या सर्व चौकशीतून येथे रईसला कुणीही मदत केली नसल्याचा निष्कर्ष पोलिसांनी आतापर्यंतच्या चौकशीतून काढला, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज पत्रकारांना सांगितले. 

चौकशी प्रदीर्घ चालणार 
नागपूर सोबतच दिल्लीतही रेकी करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाल्याने हे प्रकरण अत्यंत गँभीर बनले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आणखी अनेक दिवस सुरू राहणार आहे. स्थानिक पोलिस, दिल्ली पोलीस एटीएस, एनआयए तसेच गुप्तचर संस्था एकमेकांशी समन्वय ठेवून रेकी प्रकरणाचा तपास करीत आहेत
 

टॅग्स :Jaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस