शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार दिव्यांगांना लावणार जयपूर फूट

By admin | Updated: October 9, 2016 02:36 IST

शहर व जिल्ह्यातील सुमारे दोन हजार दिव्यांगांना नागपुरात १४ ते २५ आॅक्टोबरदरम्यान आयोजित होणाऱ्या ...

पालकमंत्री बावनकुळे यांची माहिती : १४ ते २५ आॅक्टोबरदरम्यान शिबिरनागपूर : शहर व जिल्ह्यातील सुमारे दोन हजार दिव्यांगांना नागपुरात १४ ते २५ आॅक्टोबरदरम्यान आयोजित होणाऱ्या जयपूर फूट साहित्य साधने वितरण शिबिरात जयपूर फूट लावून देण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन होत असून या शिबिरामुळे अपंगांना नवीन जीवन मिळणार आहे. भगवान महावीर विकलांग सहायता समिती, महानगरपालिका, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र व जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त वतीने हे शिबिर होत आहे. या शिबिरात दिव्यांगांना लागणारे सर्व साहित्य नि:शुल्क वितरित करण्यात येणार आहे. पाय नसलेल्यांना जयपूर फूट त्यांच्या पायाचे मोजमाप घेऊन तयार करून देण्यात येतील.यशवंत स्टेडियम धंतोली येथे होणाऱ्या या शिबिरात नागपूर अस्थिव्यंग, कर्णबधिर अशा प्रवर्गातील अपंग व्यक्तींची नि:शुल्क जयपूर फूट कृत्रिम अवयव, साहित्य साधनांसाठी भगवान महावीर विकलांग साहित्य समिती जयपूर यांच्याद्वारा तपासणी व मोजमाप करण्यात येईल. मोजमापानंतर त्यांना जयपूर फूट, कुबड्या, श्रवणयंत्र आदी लाभार्थ्यांना नि:शुल्क वाटप करण्यात येईल. सकाळी ९ वाजेपासून शिबिर सुरू होईल. शिबिरात राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची व कायद्याची माहिती देणारे स्टॉल, अपंग वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती, बस पास सुविधा स्टॉल, अपंगांबद्दल विविध शासन निर्णयांची माहिती येथे उपलब्ध राहील. अपंगांना नेण्या-आणण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सविस्तर आराखडा तयार केला आहे. याशिवाय बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकल वाटपाची योजनाही तयार करण्यात येत आहे. यावेळी आमदार सुधीर पारवे, डॉ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)