शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

...तो थॅलेसिमियाला हरवतोय !

By admin | Updated: May 8, 2015 02:06 IST

कुमार संजय भुरे हा १८ वर्षाचा तरुण मुलगा लहानपणापासूनच थॅलेसिमियाने पीडित आहे. तो मूळचा कन्हानचा राहणारा आहे.

लोकमत विशेषकुमार संजय भुरे हा १८ वर्षाचा तरुण मुलगा लहानपणापासूनच थॅलेसिमियाने पीडित आहे. तो मूळचा कन्हानचा राहणारा आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तो नरखेडला आपल्या मावशीकडे शिकायला गेला. त्याला एक विजय नावाचा लहान भाऊ आहे. कुमार ८ वी ते १२ वी पर्यंत नरखेडलाच शिकला. परंतु त्याचा आजार पाहता घरच्यांनी त्याला पुढे शिकण्यास मनाई केली. मात्र कुमारला कुठल्याही परिस्थितीत शिकण्याची जिद्द होती. आपण शिकून आपल्या पायावर उभे व्हावे आणि आपल्या भावाचा सांभाळ करायचा या जिद्देने कुमार पेटला होता. कुमारचा आजार आणि त्याची शिकण्याची जिद्द पाहून लोकमतने पुढाकार घेत समाजाला आवाहन केले. कुमारवर विशेष वृत्त प्रकाशित केले. समाजातील अनेक लोक पुढे आले. मैत्री परिवार, हेडगेवार रक्तपेढी आणि थॅलेसिमिया सोसायटी आॅफ सेंट्रल इंडियाचे डॉ. विंकी रुघवानी हे पुढे आले. त्याच्या उपचाराचा, रक्त पुरवठ्याचा आणि शिकण्याचा प्रश्न मार्गी लागला. तो शिकला. आज तो कामठीतील भोयर फार्मसी कॉलेजमधून डी.फार्म. करीत आहे. भोयर कॉलेजमधील सुरेश भोयर आणि प्राचार्य मिलिंद उमेकर यांचीही त्याला चांगली साथ लाभली. कॉलेजच्या वसतिगृहात राहून तो शिकत आहे. समाजाने दिलेल्या मदतीमुळेच आपण आतापर्यंत जिवंत आहोत, याची त्याला जाणीव आहे. थॅलेसिमियासोबतच गेल्या तीन वर्षांपासून तो मधुमेहानेही पीडित आहे. अशा परिस्थितीत मदत करणाऱ्या लोकांमुळेच मी आतापर्यंत स्वस्थ असल्याचे कुमार आवर्जून सांगतो. त्याचा लहान भाऊ विजय हा सध्या चौथ्या वर्गात आहे. तो मावशीकडे शिकत आहे. लहान भावाची जबाबदारी सांभाळता यावी म्हणून कुमार शिकत आहे. आपल्या पायावर उभे राहून लहान भावाला मोठे करायची खूणगाठ त्याने बांधली आहे. आजारामुळे निराश होणारे समाजात अनेक आहेत. परंतु मृत्यूच्या दाढेत असूनही आपल्या आजारासोबत लढताना आपले भविष्य घडविण्यासाठी सुद्धा संघर्ष करीत असलेल्या कुमारने समाजासोमोर नवीन आदर्श घालून दिला असून थॅलेसिमिया आजाराच्या जनजागृती मोहिमेतील तोच खरा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ ठरला आहे.