शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेसोबत इंग्रजीवरही प्रभुत्व हवे

By admin | Updated: November 29, 2015 03:50 IST

महाराष्ट्रात मराठीचे शिक्षण मिळायलाच पाहिजे. मातृभाषेच्या शिक्षणातून आपली संस्कृती व विचार रुजवता येतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘मेस्टा’चा पहिला राज्यव्यापी मेळावानागपूर : महाराष्ट्रात मराठीचे शिक्षण मिळायलाच पाहिजे. मातृभाषेच्या शिक्षणातून आपली संस्कृती व विचार रुजवता येतो. परंतु इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. वैज्ञानिक भाषा आहे, हे विसरून चालणार नाही. आपली संस्कृती व विचार जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी सुद्धा इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे. त्यामुळे मातृभाषेसोबतच इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्यावतीने (मेस्टा) शनिवारी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित इंग्रजी शाळा संस्थाचालकांच्या पहिल्या राज्यव्यापी महामेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. विकास कुंभारे, मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील, महासचिव राजेंद्र दायवा, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंग, स्कूल बस संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग, कोषाध्यक्ष मनीष हांडे, विदर्भ विभागाचे अध्यक्ष संजय कोचे, भादरंगे, योगेश पाटील, बुशरा पठाण, अनिल असलकर, रमादेवी रेड्डी, विनोद कुलकर्णी, नाना सातपुते, राजाभाऊ टांकसाळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील आवश्यक भाषा आहे. भारतात मातृभाषेसोबतच इंग्रजी शिक्षणामुळेच भारतीयांना परदेशातही प्रभाव वाढविण्याची संधी मिळालेली आहे. चीन, जपान, कोरिया विज्ञान तंत्रज्ञानात आघाडीवर आहेत. परंतु या देशांना जगासमोर येण्यासाठी इंग्रजीलाच प्राधान्य असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी इंग्रजीचे शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुद्धा इंग्रजी ही वाघिणीचे दूध असल्याचे स्पष्ट केले. तसेच संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी आरटीई परतावा मिळावा, आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना टी.सी. अनिवार्य करण्यात यावी, इंग्रजी शाळांना व्यावसायिक वीज बिल लावू नये, गल्लीबोळातील शाळांचे स्थलांतरण करण्यास मंजुरी मिळावी आणि डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांसाठी सुद्धा संरक्षणाचा कायदा व्हावा आदी मागण्या केल्या. याप्रसंगी मेस्टा टॅलेंट हंट परीक्षेची प्रश्नपत्रिका, मेस्टा दिनदर्शिका आणि मेस्टा बुलेटिनचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सातारा, पारनेर, शिरुर, अहमदनगर भागातील इंग्रजी माध्यम संघटनेचे विलिनीकरण यावेळी मेस्टामध्ये करण्यात आले. डॉ. राजेंद्र सिंग यांनी प्रास्ताविक केले. अवंतिका लेकुरवाळे यांनी संचालन केले. राजेंद्र दायमा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)