शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

माहिती आयोग ‘प्रभारी’ भरोसे

By admin | Updated: November 8, 2016 02:41 IST

राज्यात माहितीच्या अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य माहिती आयोगाची मौलिक भूमिका

सात खंडपीठांची जबाबदारी चार आयुक्तांवर : प्रलंबित प्रकरणांची संख्या वेगाने वाढतेय योगेश पांडे ल्ल नागपूर राज्यात माहितीच्या अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य माहिती आयोगाची मौलिक भूमिका आहे. मात्र राज्यातील सर्व खंडपीठांच्या माहिती आयुक्तांवर कामाचा प्रचंड ताण आला आहे. राज्यातील सात विभागांची जबाबदारी चार माहिती आयुक्त सांभाळत असून तीन विभागांत ‘प्रभारी’ भरोसे कामकाज सुरू आहे. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आयोगातील प्रलंबित प्रकरणांची संख्या सातत्याने वाढतेच आहे. अवघ्या सात महिन्यांत प्रलंबित प्रकरणांची संख्या १० हजारांनी वाढली आहे. माहिती अधिकार कायद्याची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणे हे आव्हानच बनले आहे. राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय मिळून एकूण आठ विभाग असून प्रत्येक ठिकाणी माहिती आयुक्तांचे पद आहे. राज्य माहिती आयोगाचे बृहन्मुंबई खंडपीठ, कोकण खंडपीठ, पुणे खंडपीठ व नागपूर खंडपीठ येथे नियमित माहिती आयुक्त होते. उर्वरित अमरावती खंडपीठ, नाशिक खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठ येथे पूर्णवेळ माहिती आयुक्तांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र २४ आॅक्टोबर रोजी राज्य माहिती आयुक्तांच्या कामकाजाचे पुनर्वाटप करण्यात आले. यात एकाही नवीन पूर्णवेळ माहिती आयुक्तांची नियुक्ती झाली तर नाहीच, शिवाय तीन माहिती आयुक्तांचे खंडपीठ बदलण्यात आले. या पुनर्वाटपानंतर माहिती आयुक्तांचा भार किंचितही कमी झालेला नाही. एकाच वेळी दोन खंडपीठांची जबाबदारी असल्यामुळे माहिती आयुक्तांना सुरळीतपणे काम करता येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे प्रलंबित तक्रारींची संख्या कमी कशी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील प्रलंबित प्रकरणे विभाग प्रलंबित अपील/तक्रारी फेब्रुवारी १६ सप्टेंबर १६ मुख्यालय ३२१ ९७० बृहन्मुंबई २,५५७ २,०५५ कोकण ५,०८२ ५,७७९ पुणे ७,६७२ ८,७८७ औरंगाबाद ३,३६९ ५,३२४ नाशिक ६,४०५ ८,९०० नागपूर ८८६ १,१५५ अमरावती ६,६४९ ९,५७८ एकूण ३२,९४१ ४२,५४८