शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय क्रीडा सेवेची सुरुवात व्हायला हवी-बेदी

By admin | Updated: September 8, 2014 02:21 IST

भारतीय पोलीस सेवा, भारतीय वन सेवा याप्रमाणे भारतीय क्रीडा सेवा (इंडियन स्पोर्टस् सर्व्हिस : आयएसएस) असणे आवश्यक असून ....

नागपूर : भारतीय पोलीस सेवा, भारतीय वन सेवा याप्रमाणे भारतीय क्रीडा सेवा (इंडियन स्पोर्टस् सर्व्हिस : आयएसएस) असणे आवश्यक असून त्यामुळे देशात खेळाला विकास होण्यास मदत मिळेल, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व महान फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी व्यक्त केले. स्पोर्टस् जर्नालिस्टस् असोसिएशन आॅफ नागपूर(एसजेएएन) आणि रायसोनी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंटिफिक सभागृहात आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रायसोनी समूहाचे सुनील रायसोनी, एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर व सचिव किशोर बागडे उपस्थित होते.क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करण्यासाठी बेदी यांच्या हस्ते हिंगणा येथील नेहरू विद्यालय (सेंटर पॉर्इंट स्कूल चषक), कामठीचे एस.के. पोरवाल महाविद्यालय (के.सी. बजाज स्मृती चषक), क्रीडा संघटक मनीष गौर (मीरादेवी दस्तुरे चषक), बास्केटबॉलपटू मुग्धा अमरावतकर (बैद्यनाथ चषक), बॅडमिंटनपटू रोहन गुरबानी (जी.एच. रायसोनी चषक), धावपटू ज्योती चव्हाण (जी.एच. रायसोनी चषक) आणि क्रिकेटपटू फैज फझल (जी.एच. रायसोनी चषक) यांना गौरविण्यात आले. भारतीय क्रीडा सेवेची संकल्पना मांडताना बेदी म्हणाले, ‘भारतीय क्रीडा क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी नवे धोरण आखण्याची गरज आहे. झपाट्याने बदलत जाणाऱ्या परिस्थितीचा विचार करता, क्रीडा क्षेत्राचा कारभार सुरळीत चालावा यासाठी इंडियन स्पोर्टस् सर्व्हिसेस ही संकल्पना अमलात आणणे गरजेचे आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी विशिष्ट प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांची गरज आहे. त्यामुळे क्रीडा संघटनांमध्ये प्रदीर्घ कालावधीपासून खुर्च्या अडवणाऱ्यांवर आपोआप बंधने येतील आणि भारतीय क्रीडा क्षेत्राचा जोमाने विकास होईल.’ बेदी पुढे म्हणाले, ‘जगात चिरकाल टिकणारे काहीच नसते. जे वर जाते ते खाली येणारच, हा प्रकृतीचा नियम आहे. वरची पातळी गाठल्यानंतर खाली येण्याचा कालावधी लांबविणारा महान खेळाडू ठरतो. खेळाडूंनी होणाऱ्या टीकेचा सकारात्मक विचार करावा. टीकेमुळे काय चुकले, याची कल्पना येते व सुधारणा करता येते.’कार्यक्रमाचे संचालन एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर व कोषाध्यक्ष सुहास नायसे यांनी केले तर सचिव किशोर बागडे यांनी आभार मानले. (क्रीडा प्रतिनिधी)