शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या मैदानाचा ‘ट्रॅक’ सुधारा

By admin | Updated: April 4, 2017 02:02 IST

नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील मैदानावरील धावण्याच्या ट्रॅकवर विद्यार्थ्यांसह सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या, ....

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनानागपूर : नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील मैदानावरील धावण्याच्या ट्रॅकवर विद्यार्थ्यांसह सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्यात.अमरावती रोडवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या खेळाच्या मैदानासह येथील सुविधांची माहिती पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी घेतली. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, माजी खासदार विलास मुत्तेमवार, महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, क्रीडा उपसंचालक रेवतकर, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या संचालक कल्पना जाधव, डॉ. माधवी मार्डीकर, डॉ. धनंजय वेळूकर आदी उपस्थित होते. विद्यापीठातर्फे ४०० मीटर लांबीच्या व आठ लेनचा सिंडर ट्रॅक खेळाडू व अभ्यागतांसाठी उपलब्ध करून दिला आहे. येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या अभ्यागतांना ट्रॅकवर आवश्यक सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगताना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सिंडर ट्रॅक हा कोळशाच्या भुकटीपासून तयार करण्यात आल्यामुळे यावर नियमित पाणी टाकणे आवश्यक आहे. चालताना त्रास होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.विद्यापीठ परिसरातील सिंडर ट्रॅकसह विविध खेळासाठी तयार करण्यात आलेल्या मैदानावर खेळाडू तसेच इतर अभ्यागतांना या परिसरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे आवश्यक स्वच्छतागृह बांधण्यात येतील. विद्यापीठाने या परिसरात आवश्यक विद्युत व्यवस्था कायम ठेवावी, तसेच संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवतानाच मैदानाच्या सभोवताल वृक्षारोपण करावे आदी सूचनाही यावेळी त्यांनी दिल्यात.कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी विद्यापीठातर्फे खेळाडू व येथे मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्यांना आवश्यक सुधारणा तात्काळ करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे डॉ. धनंजय वेळूकर यांनी सिंडर ट्रॅक तसेच अ‍ॅथलेटसाठी आवश्यक सुधारणा करण्यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)