शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहांचा दर्जा सुधारणार

By admin | Updated: November 12, 2016 03:01 IST

मराठी नाटकांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला अधिक समृद्ध केले आहे. नाटक हे समाजजागृतीचे एक प्रभावी माध्यम आहे.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : कलारंग नाट्यमहोत्सवाचे थाटात उद्घाटननागपूर : मराठी नाटकांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला अधिक समृद्ध केले आहे. नाटक हे समाजजागृतीचे एक प्रभावी माध्यम आहे. परंतु या माध्यमासमोरही अनेक आव्हाने आहेत. नाटकासाठी प्रशस्त अन् सर्व सुविधायुक्त नाट्यगृह उपलब्ध नसणे हे त्यातील एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे येत्या काळात शासनाकडून राज्यातील नाट्यगृहांचा दर्जा सुधारण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शुक्रवारी वसंतराव देशपांडे सभागृहात तीन दिवसीय कलारंग नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री रिमा लागू, प्रशांत दामले, अरुण नलावडे व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर सुरुवातीची दोन वर्षे नैसर्गिक दुष्काळाशी सामना करण्यातच निघून गेली. पण, यंदा पाऊसपाणी चांगले झाले आहे. इतर विषयांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ आहे. या वेळेचा लाभ सांस्कृतिक क्षेत्रासमोरील आव्हाने सोडविण्यासाठीही होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. यावेळी प्रेक्षकांमध्ये न्यायमूर्ती भूषण गवई, विभागीय आयुक्त अनुपकुमार, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, माजी मंत्री रणजित देशमुख, नगरसेवक संदीप जोशी उपस्थित होते. दीपग गाडगे, संदीप बारस्कर व समीर पंडित यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नाट्यमहोत्साची सुरुवात अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. यानंतर सादर झालेल्या नंदेश उमप यांच्या महाराष्ट्राच्या पोवाड्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेले. संचालन वृषाली देशपांडे यांनी केले. (प्रतिनिधी)