शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध विक्रेते अटकेत अन् मालक माेकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : राज्य शासनाने काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माेवाड : राज्य शासनाने काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देताच माेवाड (ता. नरखेड) शहरात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. पाेलीस कारवाईच्या नावाखाली अवैध दारू विक्रेत्यांना अटक करते. मात्र, ते त्यांच्याकडून दारूची खरेदी करतात, त्यांची नावे माहिती असूनही पाेलीस त्यांच्या विराेधात काेणतीही कारवाई करीत नाही.

माेवाड शहरात सुरुवातीपासून वैध आणि अवैध दारूविक्री माेठ्या प्रमाणात केली जाते. या अवैध दारू विक्रीबाबत पाेलीस कर्मचाऱ्यांना आधीपासूनच इत्यंभूत माहिती आहे. लाॅकडाऊन काळात दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिल्याने दारू पिणाऱ्यांची माेठी गाेची झाली. त्यांच्या निकडीचा फायदा घेत काहींनी चाेरूनलपून अवैध दारूविक्री करायला सुरुवात केली. त्यांनी स्वत: समाेर न येता दारू विक्रीसाठी काही माणसं नेमली. त्यांना राेज २०० ते ३०० रुपये दिले जात असून, त्यांच्याकडून दारू विकण्याची कामे करवून घेतली जातात. दारू पिण्याची सवय असलेले व कष्ट करण्याची इच्छा नसलेले काही तरुण ही कामे करायला तयार हाेतात.

सध्या शहरातील वाॅर्ड क्रमांक २, ८, ९ व ११ मध्ये माेठ्या प्रमाणात देशी दारूची अवैध विक्री सुरू आहे. ही दारू चढ्या दराने विकली जात असून, त्यातून माेठ्या प्रमाणात पैसा कमविला जात आहे. संचारबंदी असाे वा जमावबंदी असे दारू पिणारे या वाॅर्डांमध्ये फिरत दारू विक्रेत्यांचा शाेध घेतात. प्रसंगी फाेनवर संपर्क साधून दारूच्या बाटल्या मिळवितात. मिळेल त्या ठिकाणी दारू पितात. याबाबत पाेलिसांना माहिती असूनही कुणीही प्रभावी कारवाई करण्याची आणि या अवैध दारू विक्रीला कायमचा आळा घालण्याची तसदी घेत नाही. मात्र, या अवैध दारू विक्री व दारू पिणाऱ्यांमुळे संबंधित वाॅर्डमधील महिला, तरुणी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या अवैध दारू विक्रीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांच्याकडे केली आहे.

...

२०० ते ३०० रुपये मजुरी

आपण २०० ते ३०० रुपये मजुरीने दारू विक्रीची कामे करीत असल्याची माहिती काही अवैध दारू विक्रेत्यांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान दिली. ही रक्कम आपल्याला दारू दुकानदार देत असून, दुकानदाराने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे दारूच्या बाटल्यांची विक्री करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. पाेलिसांनी आपल्याला अटक केल्यानंतर आपली जमानत घेण्यापासून इतर सर्व खर्च संबंधित दुकानदार किंवा त्यांचे हस्तक करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, त्यांची नावे कधीही समाेर येत नसल्याने अवैध दारू विक्रीचा धंदा बिनबाेभाटपणे सुरू आहे.