शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

कालवा सेवा पथावरून अवैध वाहतूक सुरू

By admin | Updated: November 22, 2014 02:34 IST

परिसरातील पेंच प्रकल्पाच्या कालव्याच्या भिंतीवरून (कालवा सेवा पथ) मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे.

शुभम गिरडकर तारसापरिसरातील पेंच प्रकल्पाच्या कालव्याच्या भिंतीवरून (कालवा सेवा पथ) मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. भरधाव वाहनांमुळे उडणारी धूळ शेतातील पिकांवर बसत असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. दुसरीकडे, कालव्याच्या भिंतीची झिज होत आहे. या गंभीर प्रकाराकडे सिंचन विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.मौदा तालुक्यातील तारसा परिसरातून पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा गेला आहे. या कालव्याद्वारे ओलित व उद्योगाला पाणी पुरविल्या जाते. या कालव्याच्या दोन्ही भिंती मोठ्या व रुंद असल्याने त्यावर वाहनांची सहज वाहतूक होते. पूर्वी या भिंतीचा वापर सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कालव्याच्या पाहणीसाठी आणि शिवारातील शेतकरी शेतीच्या वहिवाटीकरिता करायचे. हल्ली या भिंतीचा वापर सर्रास वाहतुकीसाठी केला जात आहे. या भिंतीवरून वाहतूक करण्यास सिंचन विभागाने प्रतिबंध घातला असला तरी संबंधित अधिकारी वाहनचालकांवर कारवाई करण्यास तयार नसल्याने अवैध वाहतुकीला उधाण आले आहे.विशेष म्हणजे, कालव्याच्या या दोन्ही भिंती मातीच्या आहेत. शिवाय, त्यांची या परिसरात अंदाजे पाच कि.मी. लांबी आहे. भरधाव व ओव्हरलोड वाहनांमुळे या भिंतीवरील धूळ मोठ्या प्रमाणात शेजारी असलेल्या शेतातील पिकांवर व झाडांवर बसते. त्यामुळे पिकांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.