पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST2021-09-16T04:13:21+5:302021-09-16T04:13:21+5:30

.............. तीन लाखाच्या दागिन्यांची चोरी नागपूर : धंतोलीतील एका घरातून तीन लाखांचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे. उदय ...

Husband arrested for assaulting wife | पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीला अटक

पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीला अटक

..............

तीन लाखाच्या दागिन्यांची चोरी

नागपूर : धंतोलीतील एका घरातून तीन लाखांचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे. उदय मुकुंद प्रधान हे पत्नीच्या उपचारासाठी मंगळवारी दुपारी रुग्णालयात गेले होते. अज्ञात आरोपीने लोखंडाच्या ग्रीलजवळ लावलेली जाळी तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि तीन लाखांचे दागिने पळविले. धंतोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

...........

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी झाला फरार

नागपूर : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी हिंगणा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. ही घटना हिंगण्याच्या रुग्णालयात घडली. मनोज ऊर्फ मनमोहन ईश्वर सयाम (३१) रा. कान्होलीबारा असे फरार आरोपीचे नाव आहे. २०१७ मध्ये मनोजविरुद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तो जामिनावर सुटला आहे. जामीन मिळाल्यानंतर तो न्यायालयात तारखेवर जात नव्हता. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वाॅरंट जारी केला होता. त्याला अटक करून हिंगणा पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले होते. दरम्यान, पाऊस सुरू झाला आणि मनोज पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. यामुळे हिंगणा पोलिसात खळबळ उडाली आहे. मनोजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...............

Web Title: Husband arrested for assaulting wife