शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘डेंग्यू’ कसा रोखणार ?

By admin | Updated: November 20, 2014 01:06 IST

शहरावर डेंग्यू या जीवघेण्या आजाराने ‘अटॅक’ केला आहे. आजाराची गंभीरता व भीषणता पाहता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्या यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात

हायकोर्टात पुन्हा एक याचिका : उपाययोजनेचे निर्देश देण्याची विनंतीनागपूर : शहरावर डेंग्यू या जीवघेण्या आजाराने ‘अटॅक’ केला आहे. आजाराची गंभीरता व भीषणता पाहता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्या यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दुसरी जनहित याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने आज, बुधवारी दोन्ही याचिका एकत्र सुनावणीसाठी ठेवण्याचे निर्देश प्रबंधक कार्यालयाला दिलेत.अनिल आग्रे असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते समाजसेवक आहेत. शहरात यावर्षी २० डेंग्यू रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. महानगरपालिकेचे स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे डेंग्यूचा प्रसार झपाट्याने होत आहे. शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाख असताना मनपाच्या आरोग्य विभागात केवळ १२ अधिकारी कार्यरत आहेत. मेयो व मेडिकल या दोन महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. मनपा रुग्णालयांची अवस्थाही अत्यंत दयनीय आहे. शहरातील रस्त्यारस्त्यांवर जनावरांची कत्तल केली जाते. जनावरांच्या निरुपयोगी अवयवांची योग्य विल्हेवाट लावल्या जात नाही. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. स्वच्छता कर्मचारी स्वत:चे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावत नाहीत. विभागीय आयुक्तांनी ११ नोव्हेंबर २०१३ रोजी नाग नदीच्या शुद्धीकरणासाठी समिती स्थापन केली होती. समितीने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली. परंतु, यातून काहीही साध्य झालेले नाही. नियमित साफसफाई होत नसल्यामुळे शहरात असंख्य ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे जमा होतात. यात डेंग्यू डासांची पैदास होते. शहर डेंग्यूच्या विळख्यात जाण्यासाठी प्रशासन जबाबदार असून त्यांना योग्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मेडिकलचे अधिष्ठाता, पोलीस आयुक्त व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)