शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कशी नशिबानं थट्टा आज मांडली?

By admin | Updated: May 19, 2016 02:33 IST

मुलीचे लग्न तोंडावर आले. पण जवळ दमडी नाही. दुष्काळामुळे हाताला काम नाही. डोळ्यासमोर अंधार दाटलेल्या हरिभाऊला सुचेनासे झाले.

दुष्काळाने लावले भिकेच्या दारी :उस्मानाबादच्या हरिभाऊची व्यथामंगेश व्यवहारे नागपूरमुलीचे लग्न तोंडावर आले. पण जवळ दमडी नाही. दुष्काळामुळे हाताला काम नाही. डोळ्यासमोर अंधार दाटलेल्या हरिभाऊला सुचेनासे झाले. मात्र मरणाने कुटुंबाचा प्रश्न सुटणार नाही, हे त्याला ठाऊक आहे. गरीब असूनही आयुष्यभर सन्मानाने जगलेल्या हरिभाऊवर भीक मागण्याची वेळ आली आहे. मुलीच्या लग्नाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी उस्मानाबादहून आलेला हा माणूस हातात तुणतुणं घेऊन नागपूरच्या रस्त्यावर नशिबाची अवहेलना झेलतो आहे. मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळाने अनेकांचे जगणेच विस्कळीत केले आहे. गावात पाणी नाही, पाण्यामुळे शेतीचे काम नाही. या दुष्काळाने असंख्य लोकांना अक्षरश: देशोधडीला लावले आहे. हरिभाऊही त्यातीलच एक. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोधी गावचे हरिभाऊ बाबुराव लोहार. लोखंडाला गरम करून त्यावर हातोडा मारून त्याला आकार देणारे हरिभाऊ आज दुष्काळाच्या हातोड्याने पुरता कोलमडला आहे. त्यांच्या शालन नावाच्या मुलीचे ३ मार्च रोजी लग्न होते. परंतु दुष्काळ असा पडला की लग्नासाठी पैसाच गोळा झाला नाही. तीन महिने पुढे लग्न ढकलल्याने पैशाच्या जुळवाजुळवीची चिंता त्यांना सतावू लागली. त्याच्या गावात इतरांचीही परिस्थिती त्याच्यासारखीच. मदत मागणार तरी कुणाला. त्यामुळे भीक मागून पै-पै गोळा करता यावी, नागपूरचे असलेल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली व्यथा पोहचावी, या आशेने हरिभाऊ नागपूरला पोहचले. गेल्या चार ते पाच दिवसापासून हरिभाऊ पाठीशी गाठोडे बांधून, तुणतुणं वाजवित येणाऱ्या-जाणाऱ्यांपुढे हात पसरतो आहे. शहर माहीत नाही, राहण्याची जागा नाही, कुणीही शहरात ओळखीचे नाही, तळपत्या उन्हात अनवाणी फिरतो आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता इतकी आहे की, रोजगाराच्या शोधात गावातील युवा पिढी दुसऱ्या राज्यात व शहराकडे स्थलांतरीत झाली आहे. गावात वृद्ध मंडळीच आहे. हरिभाऊचा व्यवसाय लोहाराचा आहे. दुष्काळामुळे शेतीची कामेच बंद असल्याने कामठप्प आहे. वयाच्या ७० व्या वर्षी जगण्याची आशा व मुलीच्या लग्नाचे कर्तव्य पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून प्रयत्नाची पराकाष्ठा तो करीत आहे.मोठ्या आशेने नागपुरात आलोयमुख्यमंत्र्यांच्या शहरात मोठ्या आशेने आलो आहे. हे शहर मला निराश करणार नाही. मला मुख्यमंत्र्यांच्या पत्ता द्या, मी त्यांच्याकडे जाऊन मुलीच्या लग्नासाठी हात पसरेन. डोळ्याच्या कडा ओलावलेल्या हरिभाऊने आपली व्यथा बोलून दाखविली. - हरिभाऊ बाबूराव लोहार