शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मेयोमध्ये होमिओपॅथी अभ्यासक्रम

By admin | Updated: November 21, 2015 03:24 IST

राज्य मंत्रिमंडळाने होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी एक वर्षाचा ‘फॉर्माकॉलॉजी’ अभ्यासक्र म करून प्रॅक्टिस करण्याची परवानगी देत कायद्याचे बळही दिले आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिली मंजुरी : होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरणनागपूर : राज्य मंत्रिमंडळाने होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी एक वर्षाचा ‘फॉर्माकॉलॉजी’ अभ्यासक्र म करून प्रॅक्टिस करण्याची परवानगी देत कायद्याचे बळही दिले आहे. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हा अभ्यासक्रम सुरू करण्याला कॉलेज कौन्सिलने विरोध दर्शविल्याने अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वीच त्याला ग्रहण लागले होते, परंतु आता ही जबाबदारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) घेतल्याने होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या अ‍ॅकॅडेमिक कौन्सिलमध्ये १० सप्टेंबर २०१५ रोजी होमिओपॅथी डॉक्टरांकरिता फार्माकॉलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक वर्षाचा हा अभ्यासक्रम नोव्हेंबर २०१५ पासून सुरू होणार होता. अभ्यासक्रमात थेअरी व प्रॅक्टिकल दोन्हींचा समावेश राहणार होता. हा अभ्यासक्रम नागपूरच्या मेडिकल, मेयोसह विदर्भात सहा ठिकाणी प्रस्तावित होता. परंतु मेडिकलच्या कॉलेज कौन्सिलमध्ये या अभ्यासक्रमाला विरोध दर्शवित तसा ठराव वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांना पाठविला. त्यात फार्माकॉलॉजीच्या शिक्षकांना त्यांच्या नियमित वर्गासह आधीच नर्सिंग, बीपीएमटी, डेंटलला अतिरिक्त शिकवावे लागत असल्याचे कारण देण्यात आले होते. याला घेऊन होमिओपॅथी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण होते. मेडिकल जबाबदारी झटकत असल्याचे पाहत मेयोमध्ये तरी हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनेने प्रयत्न सुरू केला. या संदर्भातील प्रस्ताव मेयो प्रशासनाने विद्यापीठाकडे पाठविल्यानंतर २ नोव्हेंबरला मंजुरी मिळाली. त्या आशयाचे पत्र शुक्रवारी मेयो प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्या आधारे डिसेंबर २०१५ पासून ५० विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)