शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

घर लाखोंचे, सुरक्षेकडे कानाडोळा

By admin | Updated: May 19, 2014 00:55 IST

दाराला कुलूप लावले किंवा लॅच लॉक बसविले म्हणजे घर सुरक्षित राहील याची हमी सध्या ज्या संख्येने घरफोड्या होत आहेत, त्या बघता कोणी देणार नाही. तेव्हा लाखो रुपयांचे घर बांधताना

 नागपूर : दाराला कुलूप लावले किंवा लॅच लॉक बसविले म्हणजे घर सुरक्षित राहील याची हमी सध्या ज्या संख्येने घरफोड्या होत आहेत, त्या बघता कोणी देणार नाही. तेव्हा लाखो रुपयांचे घर बांधताना दारावरील कडी कोयंड्याच्या सुरक्षिततेकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे. शहरात मागील काही वर्षांत चोर्‍यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या चोरीच्या घटनेत चोरटे कुलुप तोडण्याऐवजी हातोडीने कडी कोयंडाच एका दणक्यात तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. डायकास्ट ब्रासचे हे आकर्षक दिसणारे कडीकोयंडे केवळ दाराची शोभा वाढविण्यापुरते ठरले आहेत. भरदिवसा घरात घुसणे, पत्रा काढून घरात प्रवेश करणे, लोखंडी दरवाजाचा कडी कोयंडा मोडून काढणे, तिजोरी कटावणीने उचकटणे, भिंतीला भगदाड पाडून घरात, बंगल्यात प्रवेश करणे, बंद घरे हेरून चोरी करणे आदी पद्धतीचा अवलंब चोरट्यांद्वारे केला जातो. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरटा चोरून नेतो. हे दागिने कमावण्यासाठी त्या कुटुंबाला अनेक वर्षे कष्ट घ्यावे लागलेले असतात. चोरीमुळे त्यांना मानसिक धक्का बसतो. कित्येकदा पगार, शैक्षणिक, घर कार्यक्रमासाठी आणून ठेवलेली रोकड पळविली जाते. त्याचा मानसिकतेवर आघात होतो. यातून सावरण्यासाठी खूप दिवस लागतात. चोरटा सापडेल याची नेमकी शाश्वती मिळत नाही. त्यामुळे पुन्हा शून्यातून संसार उभा करावा लागतो. तेव्हा घराच्या सुरक्षिततेबाबत अधिक गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सेफ्टी लॉक सिस्टीमला प्राधान्य सीताबर्डी येथील कडीकोयंडा कुलूप विक्रेता असलेले असलम भाई यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कडीकोयंडा, कुलूपाविषयी ग्राहकांमध्ये आणखी जागृतीची गरज आहे. कारण लाखो, कोटी रुपये फ्लॅट, घर वा बंगल्यावर खर्च केले जातात. पण दारावर मजबुतीऐवजी आकर्षक दिसणारा कडीकोयंडा बसविला जातो. घरफोड्या वाढल्याने अनेकजण आता सेफ्टी लॉक सिस्टीम वापरण्याला प्राधान्य देऊ लागले आहे. थोड्या महाग असलेल्या सेफ्टी लॉक सिस्टीममध्ये कॉम्प्युटर किल्ली (अल्ट्रा की) असते. यामुळे डुप्लीकेट किल्ली कंपनीशिवाय कोणालाच बनविता येत नाही. ४५० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत या सेफ्टी लॉक बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय लक्झरी फ्लॅट व रो-हाऊस, बंगल्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व्हिडिओ सिस्टीम बसविली जात आहे. बहुतांश अपार्टमेंटमध्येसुद्धा हीच प्रणाली वापरली जात आहे. (प्रतिनिधी)