शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाच्या संवर्धनाला हेरिटेजचा अडसर

By admin | Updated: May 9, 2014 02:29 IST

नागपूरच्या इतिहासात भोसले घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. राजे रघुजी महाराजांनी बारा बलुतेदारांना एकत्र करून नागपूर शहर बसविले, शहराला विकसित केले.

मंगेश व्यवहारे ■ नागपूर
नागपूरच्या इतिहासात भोसले घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. राजे रघुजी महाराजांनी बारा बलुतेदारांना एकत्र करून नागपूर शहर बसविले, शहराला विकसित केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी राजधानी व महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर उपराजधानीचा दर्जा नागपूरला मिळाला. मात्र, नागपूरचे प्रशासन राजाचा सन्मान करू शकले नाही. आज राज्याच्या समाधीची दुरवस्था झाली आहे. या समाधीचे संरक्षण व्हावे म्हणून भोसले घराणे प्रयत्नरत आहे. मात्र हेरिटेजचा अडसर असल्याने, या समाधींचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकत नाही.भोसल्यांचा राजघाट दुर्लक्षित : हेरिटेज समित्याही अस्तित्वहीन पर्यटन क्षेत्र होईल यादृष्टीने प्रयत्न करावे
या स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने याचे अस्तित्व जपले पाहिजे. लोकांना या स्थळाची माहिती व्हावी म्हणून या स्थळाचा विकास करणे गरजेचे आहे. हे स्थळ पर्यटन क्षेत्र होईल, यादृष्टीने मनपाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
दत्ता शिर्के, सचिव, युवा चेतना मंच मालक असूनही संरक्षणापासून वंचित
राजघाट हे नागपूरचे ऐतिहासिक वैभव आहे. या घाटावर भोसले घराण्याचे सर्व राजा, राणी यांच्या समाधी आहेत. बांधकामही जुन्या पद्धतीचे असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. भोसले घराणे या जागेचा आजही टॅक्स भरतात; मात्र विकास करू शकत नाही. आज या घाटाला संरक्षण भिंत नाही. घाटाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. अवैध कामे येथे होतात. हेरिटेज कमिट्या निव्वळ नावापुरत्या असून, त्यांच्यामुळेच नागपूरचे ऐतिहासिक वैभव नष्ट होत आहे.

राजे मुधोजी भोसले, भोसलेंचे १३ वे वंशज भोसले राजघराण्याचे स्वत:चे घाट आहे. त्याला राजघाट संबोधण्यात येते. या राजघाटावर भोसले घराण्यातील राणी काशीबाई सती गेल्या होत्या. त्यांचे समाधी मंदिर येथे उभारण्यात आले आहे. त्यामुळे हे राजघाट काशीबाई मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे.
नवसाला पावतात म्हणून अनेकांची श्रद्धा आहे. या राजघाटावर राजे रघुजी प्रथम, द्वितीय, तृतीय, त्यांच्या राण्या, भोसले घराण्याचे खासमखास असलेल्या लोकांची समाधी आहे. या समाध्यांचे बांधकाम अतिशय जुने आहे. त्यामुळे राजघाट परिसराची नोंद हेरिटेजमध्ये करण्यात आली आहे. राजघाट हा भोसल्यांच्या मालकीच्या जागेवर असला तरी, हेरिटेजमध्ये आल्याने त्यांचे रक्षण ते करू शकत नाही.
नागपूर महापालिकेंतर्गत येणार्‍या जुन्या वास्तूंचे जतन व्हावे, यासाठी हेरिटेज कमिटी तयार करण्यात आली होती. मात्र हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून या स्थळांचा कुठलीही विकास करण्यात आला नाही. राजघाटातील सर्व समाधींचे बांधकाम पुरातन पद्धतीचे आहे. ते जीर्ण झाले आहे. काही समाध्या खचलेल्या आहे, तुटलेल्या आहे. भोसले घराण्याचे वंशज समाधीच्या दुरस्तीला तयार असले तरी, बांधकाम करायचे असेल तर हेरिटेज कमिटीची परवानगी आवश्यक आहे.
मात्र शहरात हेरिटेज कमिटीच अस्तित्वात नसल्याने, ऐतिहासिक वारसा नष्ट होत आहे. मनपाच्या नगररचना विभागात हेरिटेज समितीच्या संदर्भात विचारणा केली असता, काही वर्षांपूर्वी ही समिती बरखास्त झाली असल्याचे सांगण्यात आले.