ऐतिहासिक मिरवणूक : शासनरूपी ‘बांकाबाई’वर व्यक्त झाला संताप

By Admin | Updated: September 3, 2016 01:06 IST2016-09-03T01:06:19+5:302016-09-03T01:06:19+5:30

बांकाबाई नावाच्या महिलेने स्वार्थासाठी इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणून नागपुरात तान्ह्या पोळ्याच्या दिवशी कागद व बांबू वापरून

Historical procession: The anger expressed on 'Baba-Baai' by the government | ऐतिहासिक मिरवणूक : शासनरूपी ‘बांकाबाई’वर व्यक्त झाला संताप

ऐतिहासिक मिरवणूक : शासनरूपी ‘बांकाबाई’वर व्यक्त झाला संताप

नागपूर : बांकाबाई नावाच्या महिलेने स्वार्थासाठी इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणून नागपुरात तान्ह्या पोळ्याच्या दिवशी कागद व बांबू वापरून केलेल्या बांकाबाईच्या पुतळयाचे दहन केले जाते. आज बांकाबाई नाही पण तिची स्वार्थी वृत्ती मात्र आजही कायम आहे आणि ती शासन व्यवस्थेच्या नसानसात भिनली आहे, असा आरोप करीत मारबत व बडग्यांची मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनी शासनरूपी ‘बांकाबाई’वर आपला संताप व्यक्त केला. वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देऊन मुकरणारा नेता, एफडीआयद्वारे बाजार व्यवस्था उद्ध्वस्त करणारा नेता, बोगस शाळा उघडून शिक्षणाचा गोरखधंदा करणारा नेता आणि या भ्रष्ट नेत्यांना साथ देणारे सेटिंगबाज नोकरदार यांच्यावर बडग्यांच्या माध्यमातून जोरदार प्रहार करण्यात आला. सैराटच्या गाण्यावर झिंगाट झालेल्या या मारबत, बडग्यांची मिरवणूक पाहायला नागपूरकरांनी तुफान गर्दी केली होती.

Web Title: Historical procession: The anger expressed on 'Baba-Baai' by the government