शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

बाळ होत नसल्याने पत्नीची बेदम मारहाण करत हत्या

By योगेश पांडे | Updated: August 28, 2024 20:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बाळ होत नसल्यामुळे वारंवार पत्नीवर संशय घेत तिला बेदम मारहाण करत एका मद्यपी पतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाळ होत नसल्यामुळे वारंवार पत्नीवर संशय घेत तिला बेदम मारहाण करत एका मद्यपी पतीने तिची हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

साबिरा वर्मा (४०, रामभूमी सोसायटी, विजयनगर) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर बाबुलाल वर्मा (४३) हा आरोपी पती आहे. वर्मा हा मेकॅनिक म्हणून काम करतो. त्याचे २० वर्षांअगोदर साबिरासोबत लग्न झाले होते. त्यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे बाबुलाल संशय घेऊन अनेकदा साबिराला शिवीगाळ करत मारहाण करायचा. काही काळापासून तो दररोजच तिच्याशी वाद घालत होता. मंगळवारी दुपारी त्याने नेहमीप्रमाणे तिच्याशी वाद घातला आणि संतापाच्या भरात तिला बांबूने मारहाण केली. यात तिच्या डोक्याला जबर जखम झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला. कामगार वसाहत असल्याने बहुतांश जण कामावर गेले होते. रात्री नऊ वाजता साबिराचा पुतण्या थानसिंग उर्फ रुपेश शंकर वर्मा याने बाबुरावला फोन केला व आत्याला फोन देण्याबाबत सांगितले.

तेव्हा बाबुलालने मी तिला ठार मारले असे सांगितले. थानसिंगला तो थट्टा करत असल्याचे वाटले. मात्र तो वारंवार तेच बोलू लागल्याने थानसिंगदेखील हादरला. त्याने बाबुलालच्या शेजाऱ्याला तिकडे जाण्यास सांगितले. वर्माचा शेजारी खिडकीतून डोकावला असता साबिरा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. तातडीने कळमना पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत साबिराची चाचपणी केली असता तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी बाबुलालला अटक केली.

डोक्याजवळ ठेवला नारळ आणि डोक्याला लावले कुंकूहत्या केल्यानंतर बाबुलाल साबिराच्या मृतदेहाजवळच बसून होता. त्याने साबिराच्या डोक्याला कुंकू लावले व डोक्याजवळ नारळ ठेवला होता. त्याने तिचा मृतदेह कापडाने झाकून ठेवला होता. लोकांनी वारंवार म्हटल्यावरदेखील त्याने दरवाजा उघडला नाही. तो पाच ते सहा तास मृतदेहाजवळ बसून असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अनेकदा दिली होती जीवे मारण्याची धमकीबाबुलाल हा नेहमी दारुच्या नशेत रहायचा व त्याने साबिराला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती नेहमी तणावात रहायची. तिने माहेरीदेखील याची कल्पना दिली होती. त्यामुळेच थानसिंग तिला नियमितपणे फोन करून तिची विचारपूस करायचा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी