शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टात वकिलाला मारहाण

By admin | Updated: September 28, 2016 03:18 IST

ओळखीच्या महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज केल्याच्या आरोपावरून प्रतापनगर पोलिसांनी

खांबोरकरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा : दोन्हीकडून परस्पर विरोधी तक्रारी
नागपूर : ओळखीच्या महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज केल्याच्या आरोपावरून प्रतापनगर पोलिसांनी अ‍ॅड नितीन धनंजय खांबोरकर (रा.सृष्टी संकुल अपार्टमेंट, बोले पेट्रोल पंपाजवळ) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे महिलेच्या पतीने मारहाण करून धमकावल्याची तक्रार अ‍ॅड. खांबोरकर यांनी नोंदविल्यावरून सदर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.

अ‍ॅड. खांबोरकर आणि पीडित महिला तसेच तिचा पती यांची जुनीच ओळख आहे. अ‍ॅड खांबोरकर यांनी पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, त्यांनीच महिलेचे कन्यादान करून लग्न लावून दिले होते. गेल्या काही दिवसांपासून अ‍ॅड. खांबोरकर महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करीत असल्याचे महिलेने पतीला सांगितले. त्यामुळे महिलेच्या पतीने अ‍ॅड. खांबोरकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता उच्च न्यायालयाच्या परिसरात अ‍ॅड. खांबोरकर आणि पीडित महिला व तिचा पती चर्चेला आले. कक्ष क्रमांक १ जवळ त्यांच्यात चर्चा सुरू होती. संवेदनशील मुद्यावरून वाद वाढल्यानंतर महिलेच्या पतीने अ‍ॅड. खांबोरकर यांना मारहाण केली. काही वकिलांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण तात्पुरते निवळले. मात्र, या घटनेमुळे विधी वर्तुळासह सर्वत्र चर्चेला उधाण आले.
दरम्यान, पीडित दाम्पत्य आणि अ‍ॅड. खांबोरकर सदर पोलिसांकडे पोहचले. अ‍ॅड. खांबोरकर यांनी पीडित महिलेनेच आपल्याला मेसेज केले होते, तेच तिला परत पाठविले, असे सांगून तिच्या पतीने आपल्याला मारहाण केली आणि पाहून घेण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदवली. त्यावरून सदर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
महिला प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीत राहते. पीडित दाम्पत्य प्रतापनगर ठाण्यात पोहचले. अ‍ॅड. खांबोरकर यांच्या मोबाईलवरून आलेले काही मेसेज दाखवत महिलेने विनयभंगाची तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी अ‍ॅड.खांबोरकरांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात कुणाला अटक झालेली नव्हती. (प्रतिनिधी)