शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षण विभागाला हवी कर्मचाऱ्यांची ‘पॉवर’

By admin | Updated: November 21, 2014 00:49 IST

शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देऊन उत्तुंग शिखर गाठण्याचे बळ देण्याची मोठी जबाबदारी राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागासमोर आहे. परंतु आजच्या तारखेत

७० हून अधिक पदे रिक्त : शासन निर्णयात सुधारणांची अपेक्षायोगेश पांडे - नागपूर शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देऊन उत्तुंग शिखर गाठण्याचे बळ देण्याची मोठी जबाबदारी राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागासमोर आहे. परंतु आजच्या तारखेत या विभागालाच कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा जाणवतो आहे. नागपूर विभागीय कार्यालयांतर्गत ७० हून अधिक पदे रिक्त असून सुरळीत व प्रभावी कामकाजासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची आवश्यकता आहे. रिक्त पदांवर नियुक्तीसाठी शासन पुढाकार घेणार का अन् हिवाळी अधिवेशनादरम्यान दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. उच्च शिक्षण विभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ तसेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशी तीन विद्यापीठे येतात. नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यातील शासकीय संस्था, महाविद्यालये, वसतिगृहे यांची जबाबदारी या कार्यालयाकडे आहे. शिवाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियंत्रणदेखील या कार्यालयाकडून करण्यात येते. येथील एकूण महाविद्यालयांची संख्या ६०० हून अधिक आहे व त्यामुळे सद्यस्थितीत या कार्यालयाकडे कामाचा मोठा ताण आहे.या विभागीय कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची दोन पदे, अधीक्षकांचे एक पद रिक्त आहेच. शिवाय ३ डिसेंबर २००८ रोजीच्या शासन निर्णयानुसार या विभागांतर्गत असणाऱ्या शासकीय कार्यालयातील वर्ग ३ व वर्ग ४ ची २०० पदे कमी करण्यात आली होती. विभागाकडून सातत्याने मागणी करूनदेखील वर्ग ३ ची १९ व वर्ग ४ च्या ४९ पदांची मागणी शासनस्तरावर प्रलंबित आहे. संबंधित पदे भरणे हे प्रशासकीय कामाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शासन याकडे गंभीरतेने लक्ष देणार का यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यासंबंधात विभागीय सहसंचालक डॉ.डी.बी.पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मुख्यमंत्री घेणार का पुढाकार?राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिक्षणक्षेत्रासंबंधात चांगला अभ्यास आहे. उच्च शिक्षणातील समस्यांची त्यांना जाण आहे. त्यामुळे उच्च शिक्षण विभागातील रिक्त पदांची समस्या किती अडचणी निर्माण करत आहे हे त्यांना माहीत आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांच्यासमोर उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ.डी.बी.पाटील यांनी हे मुद्दे मांडले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी यासंबंधात पुढाकार घ्यावा व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना संबंधित अडचणी लक्षात आणून द्याव्यात, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.शिक्षकांचे निवृत्ती वय ६०-६२ हवेशिक्षक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय सरसकट ६० किंवा ६२ करावे, अशी विभागाची धारणा आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अगोदरच कर्मचाऱ्यांची कमतरता असलेल्या या कार्यालयात कामाचा ताण वाढतो आहे. अस्तित्वात असलेल्या शासन निर्णयामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे मत शासनाला कळविण्यात आले आहे.