'ब्रेकअप'नंतरचा हाय वोल्टेज ड्रामा ! गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलासोबत जवळीक सहन न झाल्याने वाहनांची केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:40 IST2026-02-26T17:38:27+5:302026-02-26T17:40:31+5:30

Nagpur : मंगळवारी रात्रीच्या सुमारास महाल परिसरात सशस्त्र तरुणांनी घातलेला गोंधळ व वाहनांची तोडफोड याच्या कारणांचा उलगडा झाला आहे. एका तरुणीशी ब्रेकअप झाल्याच्या संतापातून एका तरुणाने साथीदारांच्या मदतीने हा गोंधळ घातला.

High voltage drama after 'breakup'! Unable to tolerate girlfriend's closeness with another boy, vehicles were vandalized | 'ब्रेकअप'नंतरचा हाय वोल्टेज ड्रामा ! गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलासोबत जवळीक सहन न झाल्याने वाहनांची केली तोडफोड

High voltage drama after 'breakup'! Unable to tolerate girlfriend's closeness with another boy, vehicles were vandalized

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मंगळवारी रात्रीच्या सुमारास महाल परिसरात सशस्त्र तरुणांनी घातलेला गोंधळ व वाहनांची तोडफोड याच्या कारणांचा उलगडा झाला आहे. एका तरुणीशी ब्रेकअप झाल्याच्या संतापातून एका तरुणाने साथीदारांच्या मदतीने हा गोंधळ घातला. या प्रकारामुळे मध्यरात्रीनंतरदेखील महालात तणाव कायम होता. आश्चर्याची बाब म्हणजे संवेदनशील भाग असूनदेखील शिवाजी पुतळा चौक परिसरात मर्यादित पोलिस कर्मचारी होते व अधिकाऱ्यांना महालातील रहिवाशांकडून या प्रकाराची माहिती मिळाली. पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांसह नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.

महालातील शिवाजी पुतळा चौकाकडून राम कूलर्स चौकाकडे जाणारा मार्ग व आतील भागांत हा प्रकार घडला. १२ ते १५ अज्ञात तरुण हातात शस्त्रे घेऊन शिवीगाळ करीत रस्त्यावरून जात होते. जोहरीपुऱ्याकडून ते राम कूलर चौकाकडे गेले. त्यांनी परिसरातील मार्गावर उभ्या असलेल्या वाहनांचीदेखील तोडफोड केली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास डझनाहून अधिक वाहने फोडण्यात आली. परिसरातील लोकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. 

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सोबतच उपायुक्त राहुल मदने हेदेखील तेथे पोहोचले. महालातील विविध भागांत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींच्या शोधाला सुरुवात झाली. पोलिसांनी नंदनवन झोपडपट्टीतील स्वरूप डोंगरे (१९) व ऋषभ राजेश खरे (१९, वैष्णोदेवीनगर, वाठोडा) यांच्यासह सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

दुसऱ्याच मुलीच्या घरात शिरले आरोपी

नंदनवन येथील रहिवासी मंगेश नावाच्या तरुणाने इन्स्टाग्रामवर एका मुलीशी मैत्री केली होती. मंगेशचे वाईट वर्तन लक्षात घेता तिने त्याच्याशी संबंध तोडले. तिने दुसऱ्या मुलाशी जवळीक केल्याची माहिती मिळताच मंगेश संतापला. मंगळवारी रात्री ११ वाजता मंगेश १५ हून अधिक तरुणांसह गांधी गेटजवळ पोहोचला. लाठ्या व शस्त्र घेऊन हल्लेखोर मुलीच्या घराचा शोध घेण्यासाठी जोहरीपुरात घुसले. हल्लेखोर प्रथम दुसऱ्याच घरात शिरले. कुटुंबाला धमकावताना त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि ते परतले. त्यांनी कॉलनीत उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली आणि ये-जा करणाऱ्यांना शिवीगाळ करून धमकावू लागले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि कॉलनीतील रहिवासी घराबाहेर पडले. परिसरातील रहिवासी ८५ वर्षीय नथुजी आकरे यांनी हल्लेखोरांना तोडफोड का करत आहात अशी विचारणा केली असता त्यांना हल्लेखोरांनी जिवे मारण्याची धमकी दिली.

Web Title : ब्रेकअप का गुस्सा: गर्लफ्रेंड की दूसरे से नज़दीकी पर वाहनों में तोड़फोड़

Web Summary : नागपुर: ब्रेकअप और प्रेमिका की दूसरे से नज़दीकी से नाराज़ युवक ने साथियों के साथ महाल में वाहनों में तोड़फोड़ की। पुलिस ने सात नाबालिगों सहित नौ लोगों को गिरफ्तार किया। घटना लड़की द्वारा लड़के के बुरे व्यवहार के कारण संपर्क तोड़ने के बाद हुई।

Web Title : Breakup Fury: Vehicles Vandalized After Girlfriend's Closeness With Another Man

Web Summary : Nagpur: Angered by his breakup and his ex-girlfriend's new relationship, a young man and his accomplices vandalized vehicles in Mahal. Police arrested nine individuals, including seven minors, after the late-night rampage caused tension in the area. The incident stemmed from a dispute after the girl ended contact due to the boy's behavior.