शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

उच्च उतीसंवर्धन प्रयोगशाळेचे काम रखडले!

By admin | Updated: August 20, 2014 00:14 IST

संत्र्याला ‘अच्छे दिन’ येणार तरी केव्हा ?

अकोला : विदर्भातील संत्र्यांवर संशोधन करू न संत्र्याच्या उत्पादनवाढीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उच्च उतीसंवर्धन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास ६.७५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध असताना, गत दोन वर्षापासून ही प्रयोगशाळा व रोपवाटिकेचे काम रखडले आहे. त्यामुळे संत्र्याला अच्छे दिन येणार तरी केव्हा, असा प्रश्न संत्रा उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे. विदर्भात जवळपास १ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्रावर संत्र्याची लागवड केली जाते; पंरतु संत्र्याचे उत्पादन हेक्टरी ३ ते १0 टन एवढेच र्मयादित आहे. १0 टन उत्पादन घेणारे शेतकरी मोजकेच आहेत. देश, विदेशात मागणी असलेल्या या संत्र्याचे उत्पादन वाढल्यास विदर्भातील शेतकर्‍यांना ते दिलासादायक ठरणारे असल्याने, याकडे कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याकरीता कृषी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातंर्गत संत्र्यावर स्वतंत्र संशोधन सुरू आहे. या प्रकल्पातंर्गत भेसळयुक्त रोपांचा शोध घेतला जाणार असून, संत्रा रोपे असलेली रोपाटिका विकसित करण्यात येत आहे. शेतकर्‍यांना दज्रेदार संत्र्याची रोपे मिळावीत, याकरीता या रोपवाटिकेतून विषाणूमुक्त व रोगमुक्त सक्षम संत्रा रोपे तयार करण्यात येणार आहेत. यासाठी उतीसंवर्धन व संत्र्यासाठी लागणारे विविध संशोधन या रोपवाटिकेत व प्रयोगशाळेत करण्यात येत आहे. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठाला ६ कोटी ९९ लाख रू पयांचा निधी उपलब्ध करू न दिला आहे. परप्रातांतून आलेल्या गलगल जातीच्या संत्र्यांच्या रोपांची भेसळ झाल्याने विदर्भातील संत्रा फळझाडांचे नुकसान होत आहे. त्यामुळेच उत्पादकतासुध्दा घटली आहे. या गलगल रोपांचा शोध शासकीय व इतर खासगी रोपवाटिकामधून घेतला जाणार आहे. यासाठीच स्वतंत्र प्रयोगशाळा व रोपवाटिका बांधण्यात येणार असून, त्यासाठी सहा कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे; परंतु अद्याप यावर कृषी विद्यापीठाचा कोणताही निर्णय झाला नसून, रोपवाटिका व प्रयोगशाळेचे कामकाज थंडबस्त्यात पडले आहे.