शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : दारूमुळे भरपाई नाकारण्याचा निर्णय रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:07 IST

रेल्वे अपघातात दोन्ही पाय कापल्या गेलेल्या प्रवाशाला दारू पिला होता म्हणून भरपाई नाकारण्याचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला.

ठळक मुद्देरेल्वे अपघातात प्रवाशाचे दोन्ही पाय कटले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वे अपघातात दोन्ही पाय कापल्या गेलेल्या प्रवाशाला दारू पिला होता म्हणून भरपाई नाकारण्याचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला. प्रवासी प्रमाणाबाहेर दारू पिला होता याचे पुरावे रेकॉर्डवर नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.दारू प्यालेली व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकत नसल्याचे गृहित धरले जाऊ शकत नाही. त्यासाठी व्यक्ती किती दारू पिली होती हे सिद्ध व्हायला पाहिजे. दारूचे प्रमाण निश्चित करण्याकरिता रासायनिक तपासणी करणे आवश्यक आहे. सामान्यत: कमी दारू पिणारी व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकते. परंतु, अधिक प्रमाणात दारू पिणारी व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकत नाही. परिणामी, व्यक्ती प्रमाणाबाहेर दारू प्यायली होती का याचा निष्कर्ष निघणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणातील अपघातग्रस्त प्रवाशाची अशी तपासणी करण्यात आल्याचे पुरावे रेकॉर्डवर नाहीत असेही उच्च न्यायालयाने सांगितले.अंकुश रामा अमझारे (३७) असे अपघातग्रस्त प्रवाशाचे नाव असून ते घोराड, ता. सेलू, जि. वर्धा येथील रहिवासी आहेत. १७ मे २०१४ रोजी ते वरोरा येथून वर्धेला जात होते. ते दाराजवळ बसले होते. भूगाव रेल्वे स्थानक येथे अचानक धक्का लागल्यामुळे ते खाली कोसळले. त्यांचे दोन्ही पाय रेल्वेखाली येऊन कापल्या गेले. त्यामुळे त्यांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने अमझारे यांच्याकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही व ते दारू पिऊन रेल्वेत बसले होते या दोन कारणांवरून भरपाईचा अर्ज फेटाळून लावला. त्या निर्णयाविरुद्ध अमझारे यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी ते अपील मंजूर केले व वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून न्यायाधिकरणचा वादग्रस्त निर्णय रद्द केला. तसेच, अमझारे यांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असे निर्देश मध्य रेल्वेला दिले.तिकिटाचा मुद्दाही खोडलाअपघातानंतर प्रवाशाकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही म्हणून भरपाई नाकारली जाऊ शकत नाही. या प्रकरणातील प्रवाशाने रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले. या परिस्थितीत त्याचे रेल्वे तिकीट हरवल्या जाऊ शकते. अपघातानंतर तो बेशुद्ध झाला होता असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वे