आला रे आला..

By Admin | Updated: May 17, 2014 01:02 IST2014-05-17T01:02:23+5:302014-05-17T01:02:23+5:30

हातात भगवे झेंडे व जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत, शिवसैनिकांनी रामटेक लोकसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विजयी उमेद्वार कृपाल तुमाने यांची सायंकाळी विजयी रॅली ...

Hello there .. | आला रे आला..

आला रे आला..

शिवसेनेचा विजयोत्सव : तुमानेवर शुभेच्छांचा वर्षांव

नागपूर: हातात भगवे झेंडे व जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत, शिवसैनिकांनी रामटेक लोकसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विजयी उमेद्वार कृपाल तुमाने यांची सायंकाळी विजयी रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला.

कृपाल तुमाने यांनी एकूण ५ लाख १९ हजार ८९२ मते घेऊन काँग्रेसचे उमेदवार मुकुल वासनिक यांचा पराभव केला. या विजयाने शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. कृपात तुमाने विजयी होणार असल्याचे निश्‍चित होताच, शेकडो शिवसैनिक कळमना परिसरात पोहोचले होते. यानंतर सायं. ६.१५ वाजताच्या सुमारास तुमाने यांना विजयी घोषित करताच, खुल्या जीपमधून तुमाने यांच्या विजय रॅलीला सुरुवात झाली. यात रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाग घेतला होता. शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊ न जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत होते. एक दुसर्‍यांवर गुलालाची उधळण करीत, फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. कळमना येथून सुरू झालेली ही रॅली वर्धमाननगर, हिवरीनगर, बगडगंज, नंदाजीनगर, चिटणवीसपुरा व झेंडा चौक येथून महाल परिसरात पोहोचली. दरम्यान ठिकठिकाणी नागरिक तुमाने यांच्या गळ्य़ात हार घालून त्यांचे स्वागत करीत होते. शिवाय तुमानेसुद्धा दोन्ही हात जोडून नागरिकांचे आभार मानत होते. सायं. ७.३0 वाजताच्या दरम्यान रॅली महाल परिसरातील बडकस चौकात पोहोचली. येथे तुमाने यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्य़ाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यानंतर तुमाने रॅलीसह महाल परिसरातील त्यांच्या जुन्या घरी पोहोचले. येथे त्यांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. यावेळी शिवसैनिकांनी मिठाई वाटून, रॅलीचा समारोप केला. (प्रतिनिधी)

Web Title: Hello there ..