शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

नकली पोलिसांचा हैदोस

By admin | Updated: March 14, 2016 03:03 IST

स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून लोकांना लुटणाऱ्या नकली पोलिसांनी शहरात हैदोस घातला आहे.

पुन्हा चौघांना लुटले : नागरिक त्रस्तनागपूर : स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून लोकांना लुटणाऱ्या नकली पोलिसांनी शहरात हैदोस घातला आहे. शनिवारी एका वृद्ध महिलेला लुटल्यानंतर पुन्हा तिघांना लुटण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बजरंगनगर येथील ७५ वर्षीय विठ्ठलराव हिंगणे हे शनिवारी सायंकाळी ५ वाजता पायी फिरत असतांना ३५ ते ४० वर्ष वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती मोटारसायकलवर त्यांच्याजवळ आली आणि सिद्धेश्वर हॉलजवळ काही गुंडांना पकडले आहे. तुमच्या हातातील अंगठी व चेन काढून रुमालमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यांनी तसे करताच ती रुमाल स्वत: बांधला व त्यांच्या हातात देऊन घरी गेल्यावरच रुमाल उघडण्यास सांगितले. हिंगणे यांनी घरी आल्यावर रुमाल उघडला तेव्हा रुमालमध्ये दागिने नव्हते. दुसरी घटना जयताळा येथे घडली. गव्हर्नमेंट प्रेस सोसायटी जयताळा येथील ५२ वर्षीय चंद्रशेखर वासनिक हे शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता जयताळा येथे पायी जात असतांना दोन व्यक्ती मोटारसायकलवर त्यांच्याकडे आल्या आणि पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या हातातील सोन्याची चेन, अंगठी काढून रुमालमध्ये ठेवण्यास सांगितले. एकाने रुमाल बांधला व दुसऱ्याने तो रुमाल त्याच्या खिशात ठेवला व पळून गेले. वासनिक यांनी रुमाल उघडून पाहिला तेव्हा त्यात दागिने नव्हते. त्याचप्रकारे शिर्डी नगर मानेवाडा येथील ७० वर्षीय टोंगसे हे रविवारी सकाळी ७.१५ वाजता मानेवाडा सिमेंट रोडने पायी फिरत असतांना ३० ते ३५ वयोगटातील दोन युवक त्यांच्याजवळ आले. त्यांनी स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या हातातील अंगठी व चेन रुमालमध्ये बांधून खिशात ठेवण्यास सांगितले. त्यांची नजर चुकवून दागिने लंपास केले. त्याचप्रकारे थोड्या दूर अंतरावर ७० वर्षीय प्रभाकर रननवरे यांनाही तसेच फसवण्यात आले. या घटनांमुळे वृद्धांमध्ये दहशत पसरली असून पोलीसही हादरले आहेत. (प्रतिनिधी)