शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून संमेलनाध्यक्षपद ‘व्हील चेअर’वरच आहे ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रख्यात कादंबरीकार प्रा.डॉ. रवींद्र शोभणे यांनी फेसबूकवर फिरणारी पोस्ट सध्या साहित्यरसिकांच्या निशाण्यावर आहे. त्याअनुषंगाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रख्यात कादंबरीकार प्रा.डॉ. रवींद्र शोभणे यांनी फेसबूकवर फिरणारी पोस्ट सध्या साहित्यरसिकांच्या निशाण्यावर आहे. त्याअनुषंगाने त्यांना ट्रोलही केले जात आहे. अनेक जण त्यांच्या मानसिकतेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत आणि अनेकांनी संमेलनाध्यक्षपद मिळत नसल्याने हे निराशावादी विचार असल्याची कोपरखळीही मारली आहे. मात्र, शोभणे आपल्या मतावर ठाम आहेत. गेल्या वर्षभरात संमेलनाध्यक्षपद ‘व्हील चेअर’वरच नाही का, असा प्रतिप्रश्न ते करीत आहेत.

‘अ.भा. म. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ८०, ८५ चा आजारी, म्हातारा, जर्जर झालेला आणि व्हील चेअरवर बसलेला असावा की सर्वत्र फिरणारा, संवाद साधणारा असावा...?’ अशी ही शोभणे यांची पोस्ट आहे. नंतर त्यांनी ‘व्हील चेअर’ हा शब्द गाळून सुधारणा केली आहे. त्याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी, आपण आपल्या भुमिकेवर ठाम असून, ‘व्हील चेअर’चा अर्थ लोकांनी दिव्यांगांशी जोडल्याने, तो शब्द गाळल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्या पोस्टमधील म्हातारा, व्हील चेअर हे व्यंगात्मक शब्द ज्यांना कळले नाही, ते साहित्यिक व रसिक कसले, असा प्रतिहल्लाही चढवला आहे. केवळ व्यक्तिहितासाठी संमेलनाध्यक्षपद असल्याचे गेल्या वर्षभरापासून समजून येत आहे. संमेलनाध्यक्षाकडून संमेलनात उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत आणि त्यानंतर पुढले संमेलन येईपर्यंत साहित्यविषयक चळवळींमध्ये नेटाने सहभागी होऊन आपले विचार प्रकट करणे, नवोदितांना मार्गदर्शन करणे अपेक्षित असते. मात्र, ९२व्या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दीब्रिटो कुठे आहेत? संमेलनाचे उद्घाटन प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी व्हील चेअरवर केले आणि त्यानंतर अध्यक्षांविनाच संमेलन पार पडले. वर्षभरही ते कुठेच दिसले नाहीत. असाच अध्यक्ष नारळीकरांच्या रूपाने लादण्याचा अट्टाहास महामंडळ करीत आहे. म्हणजे संमेलनाध्यक्षपद हे आता व्हील चेअरवरच राहणार का, असा शेला शोभणे यांनी मारला आहे.

-------

अभिजात भाषा आणि मिळालेल्या निधीचा अहवाल

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही प्रमुख मागणी आहे. मात्र, या मागणीच्या अनुषंगाने विद्यमान अध्यक्षांची भूमिकाच कळलेली नाही, शिवाय पुणे येथील पुण्यभूषण संस्था संमेलनाध्यक्षाला पुढील धोरणात्मक कामांसाठी एक लाख रुपये निधी देत असते. त्या निधीचा उपयोग झाला का आणि झाला असेल, तर त्याचा हिशोब महामंडळाकडे देणे हा नियम असल्याचे डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले.

---------

पुढची चार-पाच वर्षे माझी इच्छा नाही

अनेक जण संमेलनाध्यक्षपदासाठी मी इच्छुक असल्याचे सांगतात. मात्र, विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीत असल्याने संवैधानिकरीत्या ते अशक्य आहे. निवडणूक होती तेव्हा लढलो. आता चार-पाच वर्षांनंतर बघू असे शोभणे म्हणाले.