शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अवयव दानासाठी विश्वासात घ्या

By admin | Updated: August 14, 2014 01:22 IST

‘ब्रेन डेथ’ झालेल्या व्यक्तीने आपले अवयव दान करून इतरांचे प्राण वाचविल्यास अनेक जणांना जीवदान देणे शक्य होते, यासाठी नातेवाईकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब

रवी वानखेडे : ‘वर्ल्ड आॅर्गन डोनेशन डे’निमित्त परिसंवादनागपूर : ‘ब्रेन डेथ’ झालेल्या व्यक्तीने आपले अवयव दान करून इतरांचे प्राण वाचविल्यास अनेक जणांना जीवदान देणे शक्य होते, यासाठी नातेवाईकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब नागपूरच्या आॅर्गन डोनेशन अवेअरनेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडे यांनी केले.मोहन फाऊंडेशन, झोनल ट्रान्सप्लान्ट को-आॅर्डिनेशन कमिटीच्या संयुक्त विद्यमाने ‘वर्ल्ड आॅर्गन डोनेशन डे’निमित्त आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्यासपीठावर नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर उपस्थित होते. डॉ. रवी वानखेडे म्हणाले, जगात पहिल्यांदा १९०५ मध्ये कॉर्निआचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर १९५० मध्ये अमेरकेच्या शिकागो येथे किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. जिवंत असताना व्यक्तीला रक्त, बोनमॅरो, किडनी, लिव्हरचा काही भाग, फुफ्फुसाचा काही भाग दान देता येऊ शकतो. नैसर्गिक आणि ब्रेन डेथ असे मृत्यूचे दोन प्रकार आहेत. ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीचे ९० प्रकारचे अवयव दान करून इतरांचे प्राण वाचविणे शक्य होते. ब्रेन डेथ झालेल्या रुग्णाच्या सहा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करून आणि नंतर चार डॉक्टरांनी प्रमाणित केल्यास त्या रुग्णाचा ‘ब्रेन डेथ’ झाल्याचे जाहीर करण्यात येते. अवयव दान करून घेतल्यास इतर असंख्य रुग्णांच्या जीविताचा प्रश्न मार्गी लागू शकतो. जगात ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीचे अवयव दानाचे प्रमाण मोठे आहे. परंतु भारतात फक्त ०.२६ टक्केच ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीचे अवयव दान देण्यात येतात. भारतात चार टक्केही अवयव दान झाल्यास दक्षिण आशियातील सर्व देशांना पुरविता येतील एवढे अवयव भारतात उपलब्ध होऊ शकतात. अवयवदानासाठी प्रत्येक धर्मात परवानगी असून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक संस्थांनी प्रयत्न करून अभियान राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)