शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

केशरोपण चिकित्सा केवळ एका दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

- डॉ. रिचाज युनिक क्लिनिक : मध्य भारतातील एकमात्र सेंटर - एकाच छताखाली उपलब्ध आहेत सर्व सुविधा शहरात २२ ...

- डॉ. रिचाज युनिक क्लिनिक : मध्य भारतातील एकमात्र सेंटर

- एकाच छताखाली उपलब्ध आहेत सर्व सुविधा

शहरात २२ वर्षांपूर्वी सुरू झालेले डॉ. रिचाज युनिक क्लिनिकमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराच्या सुविधा आहेत. अत्याधुनिक मशीन, लेजर्सद्वारे त्वचा, केशगळती, लठ्ठपणा आदींनी ग्रस्त असलेल्या हजारो रुग्णांवर येथे उपचार केले जात आहे. सोबतच ॲकेडमी युनिक इंटरनॅशनल अंतर्गत युवक व महिलांसाठी विशेष अभ्यासक्रम चालविले जात आहेत. युनिक हेल्थ अँड ब्यूटी मॉलमध्ये फिटनेस, जिम उपकरण, लठ्ठपणा कमी करण्याची मशीन, फिजियोथेरपी मशीन उपलब्ध आहेत. येथे सॅनिटायझर, डिस्पोजल, मास्क, ग्लवह्ज, स्किन, हेअर मशीन, लेजर्स, सलून फर्निचर आणि ब्यूटी प्रोजेक्ट्स ठोक दरात उपलब्ध आहेत. एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असणारा हा देशातील एकमात्र ग्रुप आहे. ग्रुपने मध्य भारतात सर्वांत मोठे सेंटर तयार केले आहे. डॉ. रिचा जैन यांना १८ राष्ट्रीय, ५ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, १५० संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. आज आपण त्यांच्याशी हेअर ट्रान्सप्लान्टबाबत चर्चा करणार आहोत.

* हेअर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय?

- केस गळती सुरू असतानाच केसांची मुळे पूर्णत: नष्ट व्हायला लागल्याने संपूर्ण टक्कल पडते. तेव्हा गळालेले केस परत आणण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांटेशन केले जाते.

* हेअर ट्रान्सप्लांटेशनच्या पद्धती कोणत्या?

- पूर्वी एफयूटीमध्ये डोक्याच्या मागील भागात एक कट मारून केसांची लडी काढली जात होती. यात रुग्णाला त्रास आणि वेदना होत असत. या प्रक्रियेमुळे ट्रान्सप्लांटेशनला रुग्ण एक मोठी सर्जरी मानत असत. आता मात्र, अत्याधुनिक पद्धतीने ही प्रक्रिया केली जात असल्याने हेअर ट्रान्सप्लांटेशनला कॉस्मेटिक सर्जरी (एफयूई) मानले जाते. या सर्जरीमध्ये कोणत्याच प्रकारचा कट मारावा लागत नाही. रोबोटिक मशीनद्वारे हेअर फॉलिकल्स काढले जातात आणि एक दिवसांत दोन ते तीन हजार ग्राफ्ट मागून काढले जाऊन टक्कल पडलेल्या भागावर लावले जातात.

* ट्रान्सप्लांटची प्रक्रिया कशी असते?

- ट्रान्सप्लांट करण्याच्या एक दिवस आधी रुग्णाचे रक्त तपासले जाते. रिपोर्ट नॉर्मल असेल, तर दुसऱ्या दिवशी रुग्ण भरती होतो. केवळ डोक्यालाच एनिस्थिसिया देऊन डोनर एरियातून रोबोटिक मशीनद्वारे केस काढले जातात आणि ते पुढच्या भागात रोवले जातात. त्यानंतर त्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज दिले जाते.

* ट्रान्सप्लांटेशन करताना रुग्णाला त्रास होतो का?

- ट्रान्सप्लांटेशनच्या प्रक्रियेवेळी रुग्ण पूर्णत: सचेतन अवस्थेत असतो. स्वत:वर होत असलेली सर्जरी तो स्वत: पाहू शकतो. म्युझिक ऐकू शकतो. त्याला कोणताच त्रास होत नाही. सुटी झाल्यावर तो आपले काम पूर्वीप्रमाणे लागलीच करू शकतो. दोन दिवसानंतर तो आपल्या कार्यस्थळीही जाऊ शकतो.

* या सर्जरीचे काही दुष्परिणाम आहेत का?

- आजवर हजारो रुग्णांचे उपचार केले आहेत. आता पर्यंत कोणत्याच रुग्णाला कोणतीही समस्या उद्भवलेली नाही. ही सर्जरी पूर्णत: सुरक्षित आणि परिणामकारक आहे.

* हेअर ट्रान्सप्लांटेशनचा रिजल्ट कसा मिळतो?

- हेअर ट्रान्सप्लांटेशननंतर तीन महिन्यांपर्यंत आतून वाढ होते. तीन महिन्यानंतर बाहेरील वाढ होण्यास सुरुवात होते. यानंतर एक, दोन, तर कुठे तिन केसांची वाढ होत जाते. अशा तऱ्हेने तीन हजार ग्राफ्ट जवळपास पाच ते सात हजार केसांमध्ये परिवर्तित होते आणि सहा ते नऊ महिन्यांत संपूर्ण वाढ झालेली असते.

* केसांची ही वाढ कायम असते का?

- केसांची ही वाढ एकदा ॲक्टव्ह झाली की, आयुष्यभर रुग्णासोबत असते.

* या प्रक्रियेनंतर औषधे किंवा इंजेक्शन घ्यावे लागते का?

- सर्जरीनंतर मल्टिविटामिन्सच्या टॅबलेट्स साधारणत: चार ते सहा महिने घ्यावी लागतात. पीआरपी ब्लड प्लाज्मा पेनिट्रेशन थेरपी घेतल्याने रिजल्ट आणखी उत्तम मिळतात.

आतापर्यंत या उपचारविधीने बऱ्याच लोकांचे केस परत आल्याचे डॉ. रिचा जैन यांनी सांगितले. क्लिनिकमध्ये केसांची संपूर्ण ट्रिटमेंट, हेअर फॉल, डॅण्ड्रफ, थिनिंग ऑफ हेअर आणि शुष्क व मृतप्राय केसांवर उपचार केले जातात. ज्या रुग्णांचा डोनर एरिया कमी असतो, त्यांना हेअर रिप्लेसमेंटद्वारे केवळ दोन तासांत केशरोपण करता येऊ शकते.

..............