शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाला नाकारला अटकपूर्व जामीन

By admin | Updated: November 22, 2015 03:10 IST

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी बौद्धविहारानजीक आयोजित दहीहांडीच्या कार्यक्रमात दंगा करून काहींना जखमी करणाऱ्या एका कुख्यात गुंडाचा ...

दहीहांडी कार्यक्रमात दंगा प्रकरण नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी बौद्धविहारानजीक आयोजित दहीहांडीच्या कार्यक्रमात दंगा करून काहींना जखमी करणाऱ्या एका कुख्यात गुंडाचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. सेवक तुलाराम मसराम (३७), असे आरोपीचे नाव असून तो धरमपेठ खरे टाऊन येथील रहिवासी आहे. या प्रकरणाची माहिती अशी, ११ सप्टेंबर २०१५ रोजी पांढराबोडी येथील प्रज्ञान इंगोले याच्या घराजवळ दहीहांडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात या प्रकरणातील फिर्यादी संजय कुंदई बनोदे आणि त्याचे सहकारी डीजेच्या तालावर नाचत होते. त्याच वेळी सेवक मसराम हा आपले आठ-दहा साथीदार घेऊन आला होता. त्यांच्याजवळ तलवारी होत्या. जुन्या भांडणाचा सूड म्हणून त्यांनी तलवारीने हल्ला केला होता. त्यात बनोदे हे गंभीररीत्या जखमी झाले. बनोदे यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी भादंविच्या ३०७, ३२४, १४३, १४४, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात एकूण सात आरोपींना जामीन मिळालेल्या आहे. सेवक याच्यासह अन्य ४ आरोपी फरार आहेत. सेवक हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.सेवक मसराम याने अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. प्रकरण गंभीर असल्याने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)