शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी समाजाकरवी राबविली जाणार ‘चांगुलपणाची चळवळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST

- अरुणा पुरोहित : महिला दिनी होणार अभियानास सुरुवात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महिला दिन आला की वेगवेगळ्या ...

- अरुणा पुरोहित : महिला दिनी होणार अभियानास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महिला दिन आला की वेगवेगळ्या संस्थांकडून वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. भाषणे ठोकली जातात, महिलांच्या स्वातंत्र्याच्या, युगानुयुगे पिळवणूक झाल्याच्या, प्रगतीच्या बाता मारल्या जातात आणि दिवस लोटला की त्या बाताही विरून जातात. या सगळ्यात महिलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्राथमिक गरजेकडे अर्थात नैसर्गिक विधी टॉयलेट, शौचालयाकडे कुणाचेच लक्ष गेले नाही, ही शोकांतिका आहे. तोच धागा पकडत महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी ‘चांगुलपणाची चळवळ’ देशपातळीवर राबविली जाणार असून, याची सुरुवात नागपुरातून केली जाणार असल्याची माहिती चळवळीच्या संयोजिका अरुणा पुरोहित यांनी पत्रपरिषदेत दिली.

महिलांना वर्तमानात सर्वात मोठी भेडसावणारी समस्या म्हणजे मलमूत्रविसर्जनाची आहे. सामाजिक परिवर्तनासोबत महिला आता घराबाहेर पडायला लागल्या आहेत. व्यवसाय, नोकरी, सामाजिक उपक्रम, राजकारण या सर्वच क्षेत्रात महिला नेतृत्व करायला लागल्या आहेत. मात्र, प्रवासात त्यांच्यासाठी टॉयलेट, शौचालयाची पुरेशी व्यवस्था झालेली नाही, ही दैना आहे. बऱ्याच ठिकाणी व्यवस्था जरूर आहे. पण, त्याचा वापर महिला करू शकतात का, हा प्रश्न प्रत्येक पुरुषाने आपल्या घरातील महिलांचा विचार करून उत्तर देणे अपेक्षित आहे. याबाबत ‘चांगुलपणाची चळवळ’ देशभरात राबविण्याचा मुहूर्त महिला दिनी ७ मार्च रोजीचा निवडण्यात आला आहे. त्या अनुषंगाने देशभरात ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पुरोहित यांनी दिली. त्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले आहे. शिवाय, खास महिलांसाठी शहराच्या विविध ठिकाणी महिला शौचालये उभारण्याची व त्यांच्या स्वच्छता निरंतर होत राहावी, या बाबतीचे निवेदन महापौर, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे नीलिमा बावणे, सारिका पेंडसे, छाया शुक्ला, सुप्रिया मंगरूळकर, शैलजा पिंगळे, संजय पेंडसे, डॉ. रवी गिऱ्हे, दत्ता फडणवीस उपस्थित होते.

......