शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

नंबरचा गोलमाल,कोण होतय मालामाल?

By admin | Updated: January 11, 2017 02:40 IST

वाहनांच्या बाबतीत एकाच क्रमांकाची दोन वाहने राहूच शकत नाही. पण नागपूर शहर प्रादेशिक परिवहन

 एकाच क्रमांकाची दोन वाहने : ई-चालानमधून उघड झाले प्रकरण विशाल महाकाळकर नागपूर वाहनांच्या बाबतीत एकाच क्रमांकाची दोन वाहने राहूच शकत नाही. पण नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अजब कारभारामुळे वाहनांना एकच नंबर दोनदा दिल्याचा प्रकार घडला आहे. आरटीओच्या या कारभाराचे पितळ उघडे पाडले आहे, ‘ई चालान’ने. ‘स्मार्ट सिटी’कडे पाऊल टाकत असलेल्या नागपुरात आता वाहतुकीचे नियम तोडणारे तंत्रज्ञानाच्या मदतीने कायद्याच्या सापळ्यात सापडत आहेत. चौकाचौकात ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून वाहतूक पोलिसांतर्फे सिग्नलवरील घडामोडींवर बारीक नजर ठेवली जात आहे. नियम तोडणाऱ्यांच्या घरी थेट ‘ई-चालान’ पोहोचविले जात आहे. या चालानमधून अनेक बोगस प्रकरणेही सामोर येत आहे. महात्मा गांधीनगर येथे राहणारे मिलिंद भय्याजी मांडवेकर यांच्यासोबत झालेला प्रकारही त्यातलाच एक आहे. २५ नोव्हेंबर रोजी एलआयसी चौकात विना हेल्मेट वाहन चालवीत असल्याने मांडवेकर यांना ई-चालान मिळाले. परंतु चालानमधील छायाचित्रातील व्यक्ती अनोळखी होती. मात्र, दुचाकीचा क्रमांक एमएच ३१ डीई ८६४८ सारखाच होता. एकाच क्रमांकाची दोन वाहने कशी असू शकतात, या संशयावरून मांडवेकर यांनी सिव्हिल लाईन्स येथील वाहतूक शाखेत तक्रार केली. तेथील अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीचे रंगीत छायाचित्र दिले. यात हिरो प्लेझर ही निळ्या रंगाची आढळून आली तर त्यांच्याकडे याच कंपनीची मात्र काळ्या रंगाची दुचाकी आहे. वाहतूक पोलिसांनी अधिक चौकशीसाठी आरटीओ कार्यालयात पाठविले. आरटीओने तपासणी केल्यावर इंजिन क्रमांकापासून ते चेसीस क्रमांक सारखेच आढळले. एकाच क्रमांकाची दोन वाहने असल्याचा खुलासा झाल्याने वाहतूक शाखेने चालानवर तसे नमूद करून चालान रद्द केले. धक्कादायक म्हणजे, या घटनेची गंभीर दखल ना आरटीओ कार्यालयाने घेतली ना वाहतूक शाखेने. यामुळे आजही या एकाच क्रमांकाची दोन वाहने रस्त्यावर धावत आहेत. ई-चालान वाचविण्यासाठी अशी बोगसगिरी तर केली जात नाही ना, अशी शंकाही या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केली जात आहे.